IMPIMP

Maharashtra School Reopen | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! ‘या’ तारखेपासून इयत्ता 1 ली पासूनचे सर्व वर्ग सुरू होणार

by nagesh
Pune News | Health department regulations starting schools pune

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra School Reopen | कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्यातील सर्वच शाळा, काॅलेज बंद होत्या. मागील दोन महिन्यापांसून कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्याने माध्यमिक शाळा आणि महाविद्यालये सुरू करण्यास ठाकरे सरकारने (Thackeray Government) परवानगी दिली. मात्र पहिली ते सातवीचे वर्ग सुरु करण्यास परवानगी नव्हती. आता पहिलीपासून शाळा सुरु (Maharashtra School Reopen) करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. 1 डिसेंबरपासून राज्यातील पहिलीपासूनचे वर्ग सुरू होणार आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

पहिलीपासून सर्व विद्यार्थ्यांना ते बऱ्यापैकी जाऊन संसर्गित होणार नाहीत या पार्श्वभूमीवर त्यांना आपण शाळेमध्ये येऊन दिलं पाहिजे. 1 ली ते 4 थीचे वर्ग सोशल डिस्टन्सिंगचं पालन करुन सुरु करण्यास परवानगी द्यावी यासंदर्भात चाईल्ड टास्क फोर्सनं (Child Task Force) परवानगी द्यावी असं मत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी मांडलं होतं. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि कॅबिनेटच्या बैठकीत शाळा सुरूबाबत अंतिम निर्णय होईल. असंही टोपे म्हणाले होते. या पार्श्वभुमीवर आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 1 डिसेंबर पासून पहिलीपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि मंत्रिमंडळ, पीडियाट्रिक टास्क फोर्स यांच्याशी चर्चा केल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाने 1 डिसेंबरपासून ग्रामीण भागात पहिली ते चौथी आणि शहरी भागात पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. असं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी सांगितलं आहे. (Maharashtra School Reopen)

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

Web Title : Maharashtra School Reopen | all schools from 1st to 7th standard will start from 1st december 2021

हे देखील वाचा :

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची स्कीम तुम्हाला देईल 16 लाख रुपयांचा फायदा, तुम्हाला केवळ 10,000 रुपयांची करावी लागेल बचत

Sonam Kapoor | सोनमच्या ब्रालेटमधील ‘त्या’ बोल्ड फोटोमुळे नेटकरी संतप्त

महागाई भत्त्याच्या कॅलक्युलेशनची पद्धत बदलणार, Labor Ministry ने दिले नवीन ‘बेस ईयर’

Related Posts