IMPIMP

Maharashtra Schools | राज्यातील शाळांना 2 मे पासून उन्हाळी सुट्टी

by nagesh
Maharashtra School | summer vacation from may 2 the school will open on june 13

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनMaharashtra Schools | कोरोना संसर्गामुळे (Coronavirus) शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक कोलमडून गेले होते. मात्र परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. त्यामुळे शाळांच्या (Maharashtra Schools) कालावधीमध्ये सुसंगती आणण्यासाठी राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना (Primary, Secondary And Higher Secondary Schools) 2 मे पासून उन्हाळी सुट्टी (Summer Vacation) लागू होणार आहे. तर शैक्षणिक वर्षाची (2022 – 23) सुरुवात 13 जूनपासून होणार असल्याचा निर्णय राज्य शासनाने (Maharashtra State Government) घेतला आहे. या संदर्भातले परिपत्रक नुकतेच जारी करण्यात आले आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

या नव्या परिपत्रकानुसार इयत्ता पहिली ते नववी व 11 वीचा निकाल 30 एप्रिलला अथवा त्यानंतर सुट्टीच्या कालावधीत लागण्याची शक्यता आहे. याशिवाय हा निकाल विद्यार्थी किंवा पालकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी संबंधित शाळेची राहणार आहे. शाळांतून उन्हाळ्याची व दिवाळीची दीर्घ सुट्टी कमी करण्यात येणार आहे. त्याऐवजी गणेशोत्सव अथवा नाताळ यासारख्या सणांच्या प्रसंगी ती समायोजनाने संबंधित जिल्ह्याच्या शिक्षण अधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक) यांच्या परवानगीने घेता येईल. (Maharashtra Schools)

याशिवाय माध्यमिक शाळांच्या नियमानुसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या असणाऱ्या सुट्ट्यांपेक्षा जास्त होणार नाही याची दक्षता घ्यावी असेही या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे आगामी शैक्षणिक वर्ष जून महिन्यातील दुसऱ्या सोमवारी सुुरु होणार आहे. जर त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असेल तर त्यानंतर असणाऱ्या दिवशी शाळा सुरु होतील. तर विदर्भातील तापमान जास्त असते. त्यामुळे जून महिन्यातील चौथ्या सोमवारी शाळा सुरु होतील असे परिपत्रकात स्पष्ट केले आहे.

Web Title :- Maharashtra School | summer vacation from may 2 the school will open on june 13

हे देखील वाचा :

EPFO | PF खातेधारकांसाठी महत्वाची माहिती ! घरबसल्या इतर खात्यात ट्रान्सफर करु शकता पैसे; जाणून घ्या

Chandrakant Patil | ‘राज ठाकरे हे स्वतंत्र व्यक्तिमत्व, ते कोणाची B टीम म्हणून काम करणार नाहीत’ – चंद्रकांत पाटील

Pune Crime | घरात थेट वीजचोरी अन् जनमित्रास मारहाण करणारा कंत्राटी कर्मचारी बडतर्फ

Related Posts