IMPIMP

Maharashtra State Government | राज्य सरकारचा तुकडे बंदी कायद्याबाबत मोठा निर्णय ! केले ‘हे’ मुख्य बदल

by nagesh
Maharashtra State Government | the main decision of the maharashtra state government was to make a big decision in the piece ban law

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनMaharashtra State Government | राज्यात लागू असलेल्या तुकडे बंदी कायद्याचे सर्रास उल्लंघन होत असल्याने आणि यामुळे सरकारचा देखील महसूल बुडत असल्याने राज्य सरकारने यामध्ये बदल केला आहे. शेतीसाठी निश्चित प्रमाणभूत क्षेत्र कमी केल्याने आता तुकड्याने शेती विकता येईल, असे वृत्त अ‍ॅग्रोवनने दिले आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

तुकडा बंदी कायद्यात बदल केल्याने आता जिराईत जमीन 20 गुंठे आणि बागायत जमीन 10 गुंठे खरेदी करता येईल.
या संदर्भातील अधिसूचनेवर नागरिकांनी अप्पर मुख्य सचिव (महसूल), मंत्रालय शेतजमीन मालक आणि खरेदीदार मुंबई 400032 यांच्याकडे हरकती पाठवाव्यात, असे आवाहन महसूल विभागाने केले आहे. (Maharashtra State Government)

राज्यातील महसूलच्या 6 विभागात तालुकानिहाय प्रमाणभूत निश्चित क्षेत्राखालील तुकडे पाडून विक्री केल्यास त्यांची दस्त नोंदणी होत नाही.
मात्र, राज्यात या कायद्याचे सर्रास उल्लंघन केले जात होते.
शेतीचे तुकडे पाडून मोठ्या प्रमाणावर विक्री करण्यात येत होती.

या गैरव्यवहारांना आळा बसावा आणि सरकारचा महसूल बुडू नये यासाठी तुकडाबंदी कायद्यात दुरुस्ती करण्यासाठी राज्य शासनाने हा मसुदा तयार केला आहे.
यात प्रत्येक विभागात शेतजमिनींसाठी वेगवेगळे असलेले प्रमाणभूत क्षेत्र समान केले आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Maharashtra State Government | the main decision of the maharashtra state government was to make a big decision in the piece ban law

हे देखील वाचा :

Pune Crime | अनैतिक संबंधाच्या संशयावरुन तरुणाचा खून, मृतदेह फेकला निरा नदीत; 5 संशयित ताब्यात

Sarkari Pension | वार्षिक 60 हजार पेन्शन देईल मोदी सरकार, वयाच्या 40 पूर्वी करा ‘हे’ एक काम

Maharashtra Monsoon 2022 Update | मान्सूनची राज्यात विश्रांती, जोरदार सलामीनंतर झाले तरी काय ?

Related Posts