IMPIMP

Maharashtra Temperature | महाराष्ट्रात पुढील आठवडा थंडीचा; ग्रामीण भागांत दिसू लागले स्वेटर, शाली, गमछे

by nagesh
Maharashtra Temperature | no rain no hail just cold now maharashtra india

मुंबई / नवी दिल्ली : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Temperature | तामिळनाडू आणि आसपासच्या भागात पावसाने (Rain) थैमान घातले असले तरी, देशाच्या काही भागात थंडीचे (Cold) प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्रात तर पुढील आठवडा हा फक्त थंडीचा (Maharashtra Temperature) राहणार आहे. पिकांसाठी हे वातावरण चांगले असल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य लोकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

सध्या पडत असलेल्या थंडीचा फायदा रब्बी पिके, उन्हाळ पेर व लागवड केलेल्या कांद्याना होणार आहे. तसेच चालू असलेल्या उन्हाळ कांदा लागवडीला नजीकच्या काळात वातावरणाचा कोणताही अडथळा जाणवणार नाही. पुढील आठवड्यात मुंबईसह (Mumbai) उपनगरी भागात किमान तापमान (Maharashtra Temperature) 13-14 डिग्री पर्यंत तर कमाल तापमान 26-27 डिग्रीपर्यंत घट येऊन चांगली थंडी जाणवू शकते.

हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांच्या माहितीनुसार, ‘पुढील आठवड्यात केवळ महाराष्ट्रच (Maharashtra) नव्हे तर गुजरात (Gujarat), पश्चिम मध्य प्रदेश (West Madhya Pradesh) राज्यात किमान तापमानात विशेष घट होऊन तेथेही चांगलीच थंडी जाणवेल. त्याच बरोबर संपूर्ण उत्तर भारतात पाऊस, बर्फवृष्टी तर काही ठिकाणी गारपीट व दाट धुके तर सकलच्यावेळी खालावलेली दृश्यता असे वातावरणीय बदलामुळे महाराष्ट्रात चांगलीच थंडी जाणवू शकते.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

देशाच्या वायव्य तसेच उत्तरेतील अनेक भागात थंडीचा कहर दिसून येत आहे.
शुक्रवारी राजधानी दिल्लीच्या पालम भागात तापमान 4 अंशाच्या आसपास होते.
सफदरजंग भागातही तापमान 10 अंश होते.
हीच स्थिती उत्तर प्रदेश, हरयाणा, पंजाबमध्ये होती.
काश्मीर, हिमाचल प्रदेंश आणि उत्तराखंडात तर सध्या बर्फवृष्टी आहे.
एकूणच महाराष्ट्रातील थंडी सुसह्य असून ही थंडी गुलाबी अशीच म्हणावी लागेल.
या गुलाबी थंडीमुळे ग्रामीण भागांत स्वेटर, शाली, गमछे दिसत असले तरी मुंबईसारख्या शहरात मात्र फारच किरकोळ थंडी आहे.

Web Title : Maharashtra Temperature | no rain no hail just cold now maharashtra india

हे देखील वाचा :

Covid Vaccines Childerns | आजपासून 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात; जाणून घ्या कशी करायची नोंदणी

ATM Withdrawal Charges Rules | आजपासून ATM मधून पैसे काढण्यासाठी लागणार जास्त चार्ज ! बँक लॉकर आणि PF शी संबंधित नियमही बदलले; जाणून घ्या

Multibagger Stock | ‘या’ स्टॉकने अवघ्या 9 महिन्यात गुंतवणुकदारांना बनवलं करोडपती, तुमच्याकडे आहे का हा स्टॉक?

Related Posts