IMPIMP

Mahavikas Aghadi And BJP | ‘महाराष्ट्रातील 22 आमदार फुटतील, लवकरच भाजपाचे मंत्रिमंडळ स्थापन होईल’ – सुर्याचार्य कृष्णादेवनंद गिरीजी महाराज

by nagesh
Mahavikas Aghadi And BJP | krishnadevanand maharaj has claimed that a bjp cabinet will be formed in maharashtra soon 22 mla are in touch with bjp maharashtra

नाशिक : सरकारसत्ता ऑनलाइन Mahavikas Aghadi And BJP | नाशिकमधील त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथे माध्यमांशी बोलताना जामनगर सौराष्ट्र येथील सुर्याचार्य कृष्णादेवनंद गिरीजी महाराज (Suryacharya Krishnadevanand Giriji Maharaj) यांनी राज्याच्या राजकारणाबाबत मोठं विधान केलं आहे. ‘राज्यातील 22 आमदार फुटतील आणि राज्यात लवकरच भाजपाचे (BJP) मंत्रिमंडळ स्थापन होईल,’ असा दावा त्यांनी केला आहे. (Mahavikas Aghadi And BJP)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे जवळपास 25 आमदारसहीत गुजरातमध्ये असल्याची प्राथमिक माहिती आहे. ते सर्वजण नॉट रिचेबल आहेत. दरम्यान, एकनाथ शिंदे यांचे गुरू असल्याचा दावा करणाऱ्या कृष्णदेवनंद यांनी आज त्र्यंबकेश्वर येथे भाजपाचे सरकार यावे आणि सर्व आमदार सुरक्षित राहावे यासाठी श्री त्र्यंबकेश्वर येथे अभिषेक करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासाठी समर्थ रामदास स्वामी यांनी अभिषेक केला त्यानुसार आपण अभिषेक करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

एकनाथ शिंदे नॉट रिचेबल –

मागील काही वर्ष नाराज असलेले शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि त्याच्या गटाचे आमदार यांनी टोकाचं पाऊल उचललं आहे अशी माहिती समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांचा नाराज गट काल सायंकाळपासूनच नॉट रिचेबल असल्याची माहिती आहे. त्याचबरोबर नॉट रिचेबल असलेले एकनाथ शिंदे गुजरातच्या मेरिडियन हॉटेलमध्ये (Meridian Hotel in Gujarat) असल्याची माहिती आहे. शिंदेसोबत जवळपास 25 आमदार असल्याची माहिती सूत्राकडून मिळत आहे.

Web Title :- Mahavikas Aghadi And BJP | krishnadevanand maharaj has claimed that a bjp cabinet will be formed in maharashtra soon 22 mla are in touch with bjp maharashtra

हे देखील वाचा :

Eknath Shinde | नॉट रिचेबल झाल्यानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदेंची पहिली फेसबुक पोस्ट व्हायरल

Mahavikas Aghadi Government | महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता? एकनाथ शिंदे यांच्यासह 13 आमदार सुरतमध्ये; दुपारी भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता

Politics of Maharashtra | महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड ! विधानपरिषदेच्या निकालानंतर आघाडी सरकारमधील अंतर्गत वाद वाढला; शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे गुजरातमध्ये

Eknath Shinde | नॉट रिचेबल झाल्यानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदेंची पहिली फेसबुक पोस्ट व्हायरल

Related Posts