IMPIMP

Mahavikas Aghadi | ‘मुख्यमंत्र्यांनी 24 तासात यू-टर्न घेतला तर…’; संजय राऊतांच्या वक्तव्यावर माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

by nagesh
Mahavikas Aghadi | congress leader prithviraj chavan reaction on sanjay raut statement shivsena will think about quit from mahavikas aghadi govt

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनMahavikas Aghadi | तुमची इच्छा आहे तर शिवसेना (Shivsena) महाविकास आघाडीमधून (Mahavikas Aghadi) बाहेर पडण्यास तयार आहे. याआधी तुम्ही 24 तासांच्या आत मुंबईत या. तिथून पत्रव्यवहार किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलू नका. तुमच्या मागणीवर नक्की विचार केला जाईल, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) म्हणाले. यावर बोलताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी शिवसेना भाजपसोबत (BJP) जाणार का असा सवाल त्यांनी केला. तसेच 24 तासात मुख्यमंत्री यू-टर्न घेतील का, याबाबत मला साशंकता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या फेसबुकवरील कालच्या भाषणात ते असं काहीही बोलले नाहीत. त्यामुळे मला याबाबत आश्चर्य वाटत असल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

काँग्रेसचे नेते (Senior Congress Leader) पृथ्वीराज चव्हाण यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना ही आपली वैयक्तिक भूमिका आहे, पक्षाची नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. चव्हाण म्हणाले, शिवसेना महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारमधून बाहेर पडणार म्हणजे ते भाजपसोबत जाणार आहेत का ? गुवाहाटीत शिवसेनेचे 45 आमदार (MLA) जमल्याचे फोटो पाहून शिवसेना दबावाखाली ही भूमिका घेत आहे का ? महाविकास आघाडीतून बाहेर पडून उद्धव ठाकरे भाजपसोबत यायला तयार आहेत का ? शिवसेना पुन्हा दुय्यम भूमिका स्वीकारायला तयार आहे का ? अशा प्रश्नांची सरबत्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

कालच्या भाषणात उद्धवजी काही बोलले नाहीत. ते काही आमदारांच्या दबावाखाली असा निर्णय घेतील, असे मला वाटत नसल्याचेही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. शेवटी हा शिवसेनेचा अंतर्गत विषय आहे. याबाबत निर्णय शिवसेनेनेच घ्यायचा आहे. आमच्या हातात काहीच नाही. काँग्रेस पक्षात याबाबत अद्याप चर्चा झालेली नाही, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

दरम्यान, संजय राऊत यांच्या महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा विचार करु, या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
एकीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे (NCP) नेते आम्ही शेवटपर्यंत शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी उभे राहू, असे सांगण्यात येत आहे.
मात्र, त्याचवेळी आता शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची तयारी दर्शवित असल्याने राज्याच्या राजकारणातील समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Mahavikas Aghadi | congress leader prithviraj chavan reaction on sanjay raut statement shivsena will think about quit from mahavikas aghadi govt

हे देखील वाचा :

Eknath Shinde | संजय राऊतांच्या ‘परत या’ आवाहनानंतर एकनाथ शिंदेचं थेट उत्तर; म्हणाले – ‘आता गाडी…’

Mumbai-Pune-Deccan Queen | नव्या लुकमध्ये ‘डेक्कन क्वीन’ पुण्यात दाखल

Rakesh Jhunjhunwala पोर्टफोलिओच्या या स्टॉकमध्ये होईल दमदार नफा, 12 महिन्यात मिळू शकतो 129% तगडा रिटर्न

Related Posts