IMPIMP

Mallika Sherawat | मला मेंटली टॉर्चर करण्यात आले, मल्लिका शेरावतने पुन्हा केली इंडस्ट्रीची पोलखोल, दीपिकाच्या ’गहराइयां’साठी म्हणाली…

by nagesh
Mallika Sherawat | mallika sherawat recalls industry mentally torturing says what deepika padukone did in gehraiyaan i did 15 years ago

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन Mallika Sherawat | बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावतला (Mallika Sherawat) खूप बोल्ड समजले जाते. ’मर्डर’ (Murder Movie) आणि ’ख्वाहिश’ (khwahish) सारख्या चित्रपटांमध्ये तिच्या बोल्ड भूमिकांचे खूप कौतुक झाले होते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मल्लिकाने फिल्म इंडस्ट्रीबद्दल वक्तव्य केले आहे. तिने फिल्म इंडस्ट्री आणि मीडियाच्या एका गटावर मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. तिने म्हटले की, लोक फक्त तिची बॉडी ग्लॅमरवर लक्ष केंद्रित करतात, तिच्या अभिनयाबद्दल बोलत नाहीत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

असे म्हणाली मल्लिका…
मीडिया पोर्टलशी केलेल्या संभाषणात, मल्लिका शेरावतने गेल्या 20 वर्षांत तिच्यासाठी लिहिलेल्या भूमिकांमधील बदला बाबत वक्तव्य केले. ती म्हणाली, पूर्वी अभिनेत्री खूप चांगली असायची, ती सती-सावित्रीसारखी निष्पाप असायची किंवा ती चारित्र्यहीन व्हॅम्प्ससारखी असायची.

त्यांच्यासाठी केवळ दोन प्रकारच्या भूमिका लिहिल्या जात असत. आता जो बदल दिसत आहे तो स्त्रियांना माणसासारखा बनवतो. ती आनंदी किंवा दुःखी असू शकते. ती चुका करू शकते, गडबड करू शकते आणि हे सर्व असूनही तुम्ही तिच्यावर प्रेम करता. (Mallika Sherawat)

अभिनेत्री मल्लिकाने ’मर्डर’मधील तिच्या भूमिकेची तुलना दीपिका पदुकोणच्या ’गहराईयां’मधील भूमिकेशी केली आणि म्हणाली अभिनेत्रीला तिच्या शरीरावर अधिक विश्वास आहे. अशा प्रकारची खळबळ तेव्हा उडाली होती जेव्हा मी ’मर्डर’ चित्रपट केला.

तेव्हा लोक वेगवेगळ्या प्रकारचे किस आणि बिकिनीबद्दल बोलले.
दीपिका पादुकोणने ’गहराईंयां’मध्ये जे केले होते, ते मी 15 वर्षांपूर्वी केले होते, पण तेव्हा लोकांचे विचार खूपच लहान होते.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

ती पुढे म्हणाली, मला हे सांगायलाच हवे की इंडस्ट्री आणि मीडियाचा एक भाग माझा मानसिक छळ करत होता.
हे लोक फक्त माझ्या शरीराबद्दल आणि ग्लॅमरबद्दल बोलत होते, माझ्या अभिनयाबद्दल नाही. मी ’दशावतरम’ केला होता.
’प्यार के साइड इफेक्ट्स’मध्ये काम केले होते. आणि ’वेलकम’ मध्ये काम केले पण माझ्या अभिनयाबद्दल कोणी बोलले नाही.

वर्क फ्रंटवर बाबत बोलायचे तर, मल्लिका ’आरके’ मध्ये दिसणार आहे, ज्यामध्ये रजत कपूर देखील दिसणार आहे.
या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शनही त्यांनीच केले आहे.
या चित्रपटात कुब्बरा सैत, रणवीर शौरी आणि मनु ऋषी चढ्ढा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
कॉमेडी-ड्रामा 22 जुलै रोजी रिलीज होणार आहे आणि रणबीर कपूर आणि वाणी कपूर स्टारर ’शमशेरा’ सोबत टक्कर होईल.

Web Title :- Mallika Sherawat | mallika sherawat recalls industry mentally torturing says what deepika padukone did in gehraiyaan i did 15 years ago

हे देखील वाचा :

Tata Group | खरेदीची संधी ! टाटा ग्रुपचा जो शेअर खरेदी करण्याची होत नव्हती हिंमत, तो 1000 रुपयांपेक्षा सुद्धा जास्त झाला स्वस्त

Maharashtra Cabinet Meeting | नगराध्यक्ष, सरपंचांची निवड थेट जनतेतून होणार; जाणून घ्या शिंदे-फडणवीस सरकारनं आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेले 9 निर्णय

Mumbai High Court | आईने मुलं आणि करिअरमध्ये कशाची निवड करावी; मुंबई हायकोर्टाने दिले महत्त्वाचे निर्देश

Related Posts