IMPIMP

Mann ki Baat : ‘देशाने वाजवलेल्या टाळ्या आणि थाळ्या कोरोना योद्ध्यांच्या हृदयाला स्पर्श करुन गेल्या’

by nagesh
man ki baat 75 episode pm modi remember lockdown taali thaali and janta curfew was amazing world

नवी दिल्ली : वृत्तसंस्थादेशावर पुन्हा एकदा कोरोनाचं संकट घोंगावू लागलं आहे. पहिल्या लाटेवर मात केल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर येत असतानाच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं आहे. महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांत कोरोना रुग्णांची संख्या वेगानं वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार) देशवासियांशी ‘मन की बात’ Mann ki Baat केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी लॉकडाऊनच्या वर्षपूर्तीनिमित्त काही आठवणींना उजाळा दिला.

Bhandup Fire : ‘ठाकरे सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे 12 बळी’; भाजपची टीका

गेल्या वर्षी मार्च महिन्यातच देशाने पहिल्यांदा जनता कर्फ्यू शब्द ऐकला. महान देशातील जनतेच्या शक्तीची अनुभूती म्हणजे जनता कर्फ्यू संपूर्ण जगासाठी आदर्श उदाहरण ठरल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांनी म्हटलं आहे. हे शिस्तिचं अभूतपूर्व असं उदाहरण होतं. येणाऱ्या पिढ्यांना गोष्टीचा गर्व वाटेल. तसेच कोरोना योद्ध्यांच्या सन्मानार्थ आपण वाजवलेल्या टाळ्या, थाळ्या आणि लावलेले दिवे हे सर्व कोरोना योद्ध्यांच्या हृदयाला स्पर्श करुन गेले. त्यामुळेच कोरोना योद्ध्ये वर्षभर न थकता, न थांबता सेवा करत राहिले, असे मोदी यांनी म्हटले आहे.

अश्लील व्हिडीओ प्रकरणी भाजपचे माजी मंत्री अडचणीत ! तरुणीच्या तक्रारीनंतर FIR दाखल

कोरोना योद्ध्यांचे कौतुक करताना मोदी पुढे म्हणाले, देशाच्या प्रत्येक नागरिकाचा प्राण वाचवण्यासाठी कोरोना योद्ध्ये लढत राहिले. गेल्या वर्षी कोरोना लस कधी येणार ? असा प्रश्न सर्वांना पडला होता. पण आता आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे, ती म्हणजे भारत जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबवत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ Mann ki Baat मध्ये म्हटले.

शरद पवारांनी राज्यमंत्री भरणे यांची ‘ती’ इच्छा एका क्षणात केली पूर्ण

महिला खेळाडूंचं अभिनंदन
पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांनी विविध क्रीडा प्रकारात ठसा उमटवणाऱ्या महिला खेळाडूंचे अभिनंदन केले. पंतप्रधान मोदी म्हणाले, योगायोग म्हणजे मार्च महिन्यात जेव्हा आपण महिला दिन साजरा करत होतो, तेव्हा अनेक महिला खेळाडूंनी पदकं आणि विक्रमांची आपल्या नावावर नोंद केली. दिल्लीत झालेल्या नेमबाजी स्पर्धेत भारत पहिल्या क्रमांकावर राहिला. सुवर्ण पदकांमध्येही भारताने बाजी मारली. भारताच्या महिला आणि पुरुष नेमबाजांनी चांगली कामगिरी केली. याचपद्धतीने पी.व्ही. सिंधूने देखील सिल्व्हर मेडल जिंकले, असे सांगत मोदींनी महिला खेळाडूंचे अभिनंदन केले. एका हिंदी वेबसाईटने या संदर्भात वृत्त दिले आहे.

‘भारतीयांपेक्षा अधिक लसी परदेशात पाठवल्याची कबुली सरकारनं UN समोर दिली, पण जर…’

देवेंद्र फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका, म्हणाले – ‘सचिन वाझेंच्या 3 मालकांना फक्त ‘ही’ एकच चिंता’

‘IPS शुक्ला यांच्या अहवालामुळे ठाकरे सरकारची चांगलीच तंतरलीय, खंडणीखोरीचे बिंग फुटले’; भाजप नेत्याची टीका

Related Posts