IMPIMP

Manoj Jarange Patil | मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; उपचार घेण्यास नकार

June 11, 2024

बीड: Manoj Jarange Patil | सगे सोयरे कायद्याची सरकारने अमलबजावणी करावी या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसले आहेत. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation Andolan) मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांनी अन्न, पाणी घेण्यास नकार दिला.

तसेच कोणतेही वैद्यकीय उपचारही मनोज जरांगे यांनी नाकारले आहेत. गेल्या चार दिवसांपासून त्यांनी पाण्याचा एकही थेंब घेतलेला नाही. जरांगे यांचा बीपी खालावला आहे.

जोपर्यंत सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत मी उपचार घेणार नसल्याची भूमिका जरांगेंनी घेतली आहे. दरम्यान जरांगे पाटील यांनी उपचार घ्यावे, अन्यथा त्यांची प्रकृती आणखी खालावेल असं डॉक्टर जयश्री भुसारी माध्यमांशी बोलताना सांगितलं. दरम्यान आम्ही त्यांना वारंवार उपचार घेण्यास सांगतोय. मात्र जरांगे पाटील यांनी उपचार नाकारल्याची प्रतिक्रिया डॉक्टर जयश्री भुसारी यांनी दिली आहे.