IMPIMP

Pakistan Train Accident : पाकिस्तानमध्ये दोन ट्रेनच्या धडकेने 33 लोकांचा मृत्यू, 50 जखमी (व्हिडीओ)

by omkar
Pakistan Train Accident

नवी दिल्ली : वृत्त संस्था – सरकारसत्ता ऑनलाइन – पाकिस्तानमध्ये एक मोठी रेल्वे दुर्घटना (Pakistan Train Accident) घडली आहे. ज्यामध्ये आतापर्यंत 33 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 50 लोक जखमी झाले आहेत.ही दुर्घटना (Pakistan Train Accident) सिंध प्रांताच्या डहारकीमध्ये घडली.
हे ठिकाण येथील घोटकी जिल्ह्यात आहे. येथे दोन प्रवाशी ट्रेन मिल्लत एक्सप्रेस (अप) आणि सर सैय्यद एक्सप्रेस (डाऊन) समोरासमोर धडकल्या. 33 लोकांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला डेप्युटी कमिश्नरने दिला आहे. जखमींमधील अनेकांची प्रकृती गंभीर आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

लठ्ठ लोकांमध्ये लाँग कोविड इफेक्टचा धोका जास्त, जाणून घ्या

या ट्रेनची धडक रेती आणि डहारकी रेल्वे स्टेशनच्या दरम्यान झाली. मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, अनेक लोक ट्रेनमध्ये सुद्धा अडकलेले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. येत्या काही तासात मृतांची संख्या वाढू शकते. घटनेची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी पोहचले. यानंतर मदतकार्य सुरू करण्यात आले. अधिकार्‍यांचे म्हणणे आहे की, सध्या ते सांगू शकत नाहीत की, ट्रेन सेवा पुन्हा सुरू होण्यास किती वेळ लागेल. येथून जाणार्‍या ट्रेन रद्द केल्या जाऊ शकतात.

मार्चमध्ये सुद्धा झाली होती दुर्घटना
यापूर्वी याच वर्षी मार्चमध्ये सुद्धा पाकिस्तानमध्ये रेल्वे दुर्घटना झाली होती. येथे कराची एक्सप्रेस अपघातग्रस्त झाली होती. ही ट्रेन लाहोरहून निघाली होती आणि सुक्कुर प्रांतात अपघाग्रस्त झाली. तिचे आठ कोच रूळावरून घसरले होते. अपघातात एका व्यक्तीची मृत्यू झाला होता. तर 40 च्या जवळपास प्रवाशी जखमी झाले होते. यावेळी अनेक लोक ट्रेनच्या आत अडकले होते आणि ट्रेन सेवा रद्द करण्यात आली होती.

Also Read:- 

Pune Crime News : पुण्यात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या सेक्स ‘रॅकेट’चा पर्दाफाश

E-Pass l पुण्यातून ‘या’ 8 जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पास आवश्यकच – पुणे पोलीस

दुसर्‍यांदा पिता बनला प्रिन्स हॅरी, पत्नी मेगन मर्केलनं दिला गोंडस मुलीला जन्म, ‘लिली डायना’ ठेवलं नाव

जाणून घ्या 7 जूनचे राशीफळ; ‘या’ 4 राशींसाठी उघडतील प्रगतीचे नवे मार्ग

Video : छत्रपती संभाजीराजेंचा रायगडावरून इशारा, म्हणाले – ‘मी मेलो तरी चालेल पण, समाजाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही’

‘आतापर्यंत तुम्ही माझा संयम पाहिला, पण इथून पुढे…’, खा. संभाजीराजेंची आंदोलनाची हाक; ‘या’ तारखेला निघणार पहिला मोर्चा (व्हिडीओ)

‘…उत्सुकतेपोटी माझ्या अंगावर तेव्हाही काटा आला होता, आज लिहितानाही येतो’ – जयंत पाटील

Related Posts