IMPIMP

Maratha Reservation | ‘एकच मिशन, मराठ्यांचं ओबीसीकरण’ ! मराठा संघटनेची मागणी

by omkar
Maratha Reservation

बीड :  सरकारसत्ता ऑनलाइन –  सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मराठा आरक्षण (Maratha Reservation Act)  कायदा रद्द ठरवल्यानंतर मराठा समाजात नाराजी व्यक्त झाली. यावरून आता मराठा आरक्षण कायदा व्हावा यासाठी मराठा समाज अनेक बैठका आणि मोहीम घेण्यास सुरुवात करीत आहे. तसेच मराठवाड्यात मराठा आरक्षण (Maratha reservation) संघर्ष समिती विविध ठिकाणी बैठका घेत आहे. मराठा आरक्षण संघर्ष समितीने (maratha organization) बीड येथे ‘एकच मिशन, मराठ्यांचं ओबीसी करण’ अशा घोषणा देत मराठा समाजाचा ओबीसीमध्ये (OBC) समावेश करावा अशी मागणी केलीय.

संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांना टोला, म्हणाले – ‘वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची’

समितीचे अध्यक्ष प्रदीप साळुंखे यांनी मागणी करत OBC हा मराठा समाजाचा हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असा निश्चय त्यांनी त्यावेळी केला.
यामुळे आता मराठा (Maratha) आणि ओबीसी (OBC) संघर्ष उफाळण्याची शक्यता समोर दिसत आहे.

मराठा आरक्षण संघर्ष समितीचे (maratha organization) अध्यक्ष प्रदीप साळुंखे म्हणाले, हैदराबाद संस्थानातील मराठवाडा सामील झाला आहे.
म्हणून मराठा समाजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, यामध्ये तेलंगणामध्ये मराठा समाजाला आज देखील कुणबी म्हणून ओबीसीमध्ये (OBC) आरक्षण आहे.
निजाम कालीन कागदपत्रे शोधण्यासाठी समिती नेमण्यात यावी आणि पुरावे द्यावेत अशी मागणी साळूंखे यांनी केलीय.
तसेच, पुढे अध्यक्ष साळूंखे म्हणाले, तोडफोड आणि रास्ता रोको करून अथवा मोर्चा काढल्याने न्यायालय (Court) दखल घेत नाही, त्यामुळे कायदेशीर लढाई करणार असल्याचे देखील म्हटलं आहे.
दरम्यान, मराठवाड्यातील मराठा हा ओबीसीचं (OBC) असल्याचा दावा समितीचे अध्यक्ष प्रदीप साळूंखे यांनी केला आहे.
तर, OBC समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण (Reservation) ठरवल्यामुळे OBC समाज आक्रमक आहे.
यामध्येच मराठा समाजाकडून OBC मध्ये आरक्षण द्यावे अशी मागणी होत असल्याने मराठा व ओबीसी आमने-सामने येण्याचे चिन्हे दिसत आहेत.

Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले – ‘महाराष्ट्राच्या हिताची तडजोड होणारा कोणताही निर्णय घेणार नाही’

मराठवाड्यातील मराठा समाज OBC आरक्षणापासून (reservation) वंचित राहिला आहे.
मराठवाड्यातील मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करून शिक्षण व नोकरीतील अनुशेष भरून निघावा,
यासाठी छावा मराठा संघटनाचे संस्थापक अध्यक्ष किशोर चव्हाण यांनी हायकोर्टात आव्हान केले आहे.
तर हैदराबाद संस्थानात असलेल्या कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातील मराठा समाजास OBC आरक्षण (reservation) मिळाले.
मात्र मराठा समाजाला नाही. चव्हाण यांनी कोर्टात केलेल्या याचिकेसाठी मराठवाड्यामधून तज्ज्ञांनी सहकार्य करावे, असं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, प्रदीप साळूंखे म्हणाले, आरक्षणामुळे मिळालेले मराठा समाजाचे सर्व प्रश्न सुटणार नाहीत म्हणून अन्य प्रश्नाकडे देखील राज्य सरकारने लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

शरद पवार यांचा ठाम विश्वास, म्हणाले – ‘महाविकास आघाडीचे सरकार 5 वर्ष टिकणार’

Web Title : Maratha Reservation | ‘One Mission, Making Maratha OBC’! Demand for Maratha organization

Related Posts