IMPIMP

Maratha Reservation | ‘मराठा आरक्षणामध्ये तरतुद होत नाही तो पर्यंत पोलीस भरती प्रक्रिया थांबवावी’; भारतीय मराठा संघाचे महाराष्ट्र सरकारकडे निवेदन

by nagesh
Maratha Reservation | 'Police recruitment process should be stopped until provision is made in Maratha reservation'; Statement of Bharatiya Maratha Sangh to Government of Maharashtra

ठाणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – महाराष्ट्र पोलीस भरती 2022 ची जाहिरात 08 नोव्हेंबर 2022 रोजी प्रसिद्ध झाली. या अधिसूचनेद्वारे एकूण 18831
पदांची भरती केली जाणार आहे. या येणाऱ्या पोलीस भरती प्रक्रियेत मराठा समाजाला वगळले जाऊ नये, त्यांना आरक्षण (Maratha Reservation)
मिळाल्याशिवाय भरती होऊ नये. मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळेपर्यंत पोलिस भरती तात्काळ थांबवण्यात यावी. तसेच
105 घटनादुरुस्तीने राज्य शासनाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार बहाल केला आहे, त्या अधिकाराचा
वापर करत मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशा पद्धतीचे निवेदन भारतीय मराठा संघाच्या वतीने ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत राज्य सरकारला देण्यात आले.

भारतीय मराठा संघाचे अविनाश पवार ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पत्रकारांशी बोलत होते. मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देऊनच ही भरती केली जावी, अन्यथा ही भरती केली जाऊ नये. अशी मागणी निवेदनामार्फत त्यांनी शिंदे फडणवीस सरकारकडे केली आहे. याशिवाय त्यांनी अजून एक निवेदन देऊन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या शिवाजी महाराजांच्या विरोधातील वक्तव्याचा निषेध केला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आहे, त्यांच्याबद्दल असे वक्तव्य करणारी व्यक्ती कधीही
महाराष्ट्राचे हित जपू शकत नाही. त्यामुळे भाजपने भगतसिंग कोश्यारी यांना महाराष्ट्रच्या राज्यपाल पदावरून
काढावे, अशी मागणी या निवेदनातून केली आहे. जर त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर मराठा समाज
आंदोलन करेल, असा इशारा ही त्यांनी दिला आहे.

Web Title :- Maratha Reservation | ‘Police recruitment process should be stopped until provision is made in Maratha reservation’; Statement of Bharatiya Maratha Sangh to Government of Maharashtra

हे देखील वाचा :

Pune Crime | चाकणमधील ‘त्या’ महिलेचा खून प्रेमसंबंधातून, आरोपी प्रियकराला 24 तासात अटक

Vinayak Raut | शिंदे सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा करतंय; उद्धव ठाकरे शेतकरी संवाद मेळावा घेणार – विनायक राऊत

Pune Pimpri Crime | चेकचा दुरुपयोग करुन पुतण्याने केली काकाची 3 कोटींची फसवणूक; पिंपरी-चिंचवडमधील घटना

MP Vinayak Raut | खा. प्रतापराव जाधवांच्या गौप्यस्फोटाला खा. विनायक राऊतांचा पलटवार; म्हणाले,”ज्या पद्धतीने कावीळ झालेल्या व्यक्तींना सगळीकडे पिवळे दिसते, त्याच पद्धतीने…”

Related Posts