IMPIMP

Mayor Murlidhar Mohol | 15 ते 18 वयोगटासाठी पुणे शहरात 5 लसीकरण केंद्रे, महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती

by nagesh
Mayor Murlidhar Mohol | Information about 5 vaccination centers in Pune city for 15 to 18 year olds, Mayor Muralidhar Mohol

पुणे :  सरकारसत्ता  ऑनलाइन – केंद्र सरकारच्या (Central Government) निर्देशानुसार पुणे मनपा (PMC) हद्दीतील 15 ते 18 वयोगटातील नागरिकांसाठी कोरोना लसीकरणाचे (Corona Vaccination) नियोजन केले असून या वयोगटासाठी शहरात 5 स्वतंत्र लसीकरण केंद्राचे नियोजन केल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Murlidhar Mohol) यांनी दिली. यासाठी 1 जानेवारीपासून कोविन पोर्टलवर नोंदणी सुरु होत असल्याचेही मुरलीधर मोहोळ (Mayor Murlidhar Mohol) म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशाला संबोधित करताना 15 ते 18 वयोगटातील लाभार्थ्यांना कोरोना लसीकरण सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यास अनुसरून पुणे महापालिकेचे (Pune Municipal Corporation) नियोजन पूर्ण झाले आहे. याबाबत माहिती देताना महापौर मुरलीधर मोहोळ मुरलीधर मोहोळ (Mayor Murlidhar Mohol) म्हणाले, नवीन लाभार्थी वयोगटासाठी कोवॅक्सिन लस (Covacin Vaccine) देण्याचे निर्देश देण्यात आले असून त्या दृष्टीने लशीचा मुबलक साठा उपलब्ध करण्यात येत आहे. शहरातील सर्व भागातील लाभार्थ्यांना लस घेता यावी, यासाठी शहरात पहिल्या टप्प्यात 5 स्वतंत्र लसीकरण केंद्रे (Vaccination Center) सुरू करण्याचे नियोजन पूर्ण झाले आहे. 18 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करताना पुणे महापालिकेने उत्तम कामगिरी केली होती, तशीच कामगिरी या वयोगटासाठीही करण्याचा प्रयत्न आहे’.

‘2007 किंवा त्यापूर्वी जन्मलेले या लसीकरणासाठी पात्र ठरले असून लाभार्थ्यांना नव्या वर्षाच्या पाहिल्याच दिवशी लसीकरण नोंदणी करता येणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारचे कोविन हे पोर्टल (Covin Portal) किंवा एप्लिकेशन वापरावे लागणार आहे. यात 50 टक्के ऑनलाईन आणि 50 टक्के ऑफलाईन नोंदणी करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. शिवाय लसीकरणाला येताना लाभार्थ्यांकडे आधार कार्ड/ओळखपत्र आवश्यक असणार आहे, असेही महापौर मोहोळ म्हणाले.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

लसीकरणासाठी सुरू होणारी स्वतंत्र केंद्रे

1. कै. दशरथ बळीराम भानगिरे दवाखाना, महंमदवाडी, हडपसर

2. कमला नेहरू रुग्णालय, मंगळवार पेठ

3. कै. जयाबाई सुतार दवाखाना, कोथरूड

4. भारतरत्न स्व. राजीव गांधी हॉस्पिटल, येरवडा

5. कै. मुरलीधर लायगुडे दवाखाना, वडगाव खुर्द

Web Title :- Mayor Murlidhar Mohol | Information about 5 vaccination centers in Pune city for 15 to 18 year olds, Mayor Muralidhar Mohol

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Restrictions in Maharashtra | राज्यातील कडक निर्बंधाबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं विधान; म्हणाले…

Gulabrao Patil | हल्ल्यानंतर एकनाथ खडसेंचा शिवसेनेवर आरोप; गुलाबराव पाटलांनी केला पलटवार, म्हणाले…

Coronavirus in India | ‘कठोर पावले उचला, तरच तिसरी लाट…’, महाराष्ट्रासह 8 राज्यांना केंद्राचा अलर्ट

Related Posts