IMPIMP

Mayor Murlidhar Mohol | महापौर मुरलीधर मोहोळ यांना पुन्हा एकदा ‘कोरोना’चा संसर्ग

by nagesh
Mayor Muralidhar Mohol | Nalstop double flyover open from Sunday, Mayor Muralidhar Mohol informed

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनMayor Murlidhar Mohol | ‘पहिल्या लाटेत कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) झालेले महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Murlidhar Mohol) यांना तिसऱ्या लाटेत पुन्हा कोरोनाचा संसर्ग झाला आहे. महापौर कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. या सर्वांची प्रकृती व्यवस्थित असून घरीच उपचार घेत आहेत. मागील आठवड्यात महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar) हे कोरोना पॉझिटिव्ह झाले असून ते देखील घरीच उपचार घेत आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पुण्यातील कोरोनाच्या रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये होणार्‍या नव्या रूग्णांच्या वाढीत थोडी घट झाल्याचे दिसून येत आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर बहुसंख्य रूग्ण हे घरीच उपचार घेत असल्याचं दिसून येत आहे. नागरिकांनी गर्दी करू नये, घराबाहेर पडताना मास्क परिधान करावं असं आवाहन वेळावेळी प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. एवढंच नव्हे तर पुणे मनपा प्रशासन (Pune Corporation) आणि पुणे पोलिसांकडून (Pune Police) संयुक्तरित्या मोहिम राबवून विनामास्क फिरणार्‍यांवर दंडात्मक कारवाई देखील करण्यात येत आहे. दरम्यान, तिसर्‍या लाटेत पुन्हा एकदा पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Murlidhar Mohol) हे कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. त्यांच्या कार्यालयातील देखील काही जणांना संसर्ग झाला असून त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत अशी माहिती देण्यात आली आहे.

Web Title :- Mayor Murlidhar Mohol | Mayor Muralidhar Mohol once again infected with coronavirus

हे देखील वाचा :

PAN-Aadhaar Link | SBI कडून 40 कोटी ग्राहकांना अलर्ट! हे काम केलं नाही तर तुमची बँकिंग सेवा बंद होऊ शकते, जाणून घ्या

Hair Care Tips | थंडीत केसांची काळजी कशी घ्याल? वापरा या खास टिप्स, केसही उगवतील घनदाट !

Tata Sky | 18 वर्षानंतर बदलणार आहे DTH कंपनी टाटा स्कायचे नाव, आता Tata Play च्या नावाने ओळखली जाईल

Maharashtra School Reopen | 1 फेब्रुवारीपासून शाळा सुरु होणार? राजेश टोपेंनी दिले स्पष्ट संकेत

Home Remedies For Constipation | बद्धकोष्ठता पासून सुटका मिळवायची असेल तर खा ‘या’ 4 गोष्टी; जाणून घ्या

Related Posts