IMPIMP

MHADA Exam | म्हाडाच्या ऑनलाईन परीक्षेत डमी उमेदवार, आरोपी गुन्हे शाखेच्या ताब्यात; बीडमध्ये खळबळ

by nagesh
Pune Crime | A case has been filed against Bhumi Construction for defrauding beneficiaries including MHADA

बीड :  सरकारसत्ता ऑनलाइनआरोग्य भरतीच्या परीक्षेनंतर (Health Recruitment Exam) बीडमध्ये (Beed) आज होत असलेल्या म्हाडाच्या परीक्षेतही (MHADA Exam) गोंधळ पहायला मिळाला. वडझरी (Vadzari) इथल्या उमेदवाराच्या जागी परीक्षा देण्यासाठी आलेल्या डमी उमेदवाराला (Dummy Candidate) शिवाजी नगर पोलिसांनी (Shivaji Nagar Police Station) ताब्यात घेतले आहे. आज राज्यातील विविध केंद्रावर महाराष्ट्र गृहनिर्माण (Maharashtra Housing) व क्षेत्रविकास प्राधिकरण (Area Development Authority) विभागाची परीक्षा (MHADA Exam) होत आहे. अर्जुन बाबुलाल बिघोटे (Arjun Babulal Bighote) असे ताब्यात घेतलेल्या डमी विद्यार्थ्याचे नाव आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

अर्जुन बिलाल बिघोट हा डमी उमेदवार शहरातील दिशा कॉम्प्युटर (Disha Computer) या म्हाडा परीक्षेच्या परीक्षा (MHADA Exam) केंद्रावर आला होता. डमी उमेदवार असल्याचा संशय आल्याने परीक्षा केंद्र चालकांनी पोलिसांना तात्काळ याची माहिती दिली. पोलिसांनी त्याची झाडाझडती घेतली असता त्याच्याकडे ओळखपत्र (ID Card) आढळून आले नाही. शिवाय त्याच्याकडे डिवाइस आणि इतर साहित्य सापडले असून त्याची चौकशी केली असता तो राहुल किसन सानप या विद्यार्थ्याच्या जागी परीक्षा देण्यासाठी आल्याचे उघड झालं.

दरम्यान, आरोपीने पोलिसांच्या तावडीतून पळून जाताना आरोपीला जालना रोड परिसरात एका बँकेच्या समोर पोलीस कर्मचारी संगीता शिरसाट, संजय राठोड, मोहसीन शेख आणि जेल पोलिस कर्मचाऱ्यांच्या मदतीने पकडले. आरोपी अर्जुन बिघोट हा औरंगाबाद जिल्ह्यतील (Aurangabad District) कन्नड तालुक्यातील जावखेडा येथील असल्याचे सांगण्यात येत आहे.

Web Title :- MHADA Exam | dummy student in mhada exam accused arrested by beed police local crime branch

हे देखील वाचा :

Maharashtra New Corona Guidelines | आजपासून राज्यातील निर्बंध शिथिल, काय सुरू, काय बंद?

Budget-2022 | काय स्वस्त, काय महाग? ‘महाबजेट’ नंतर पैसे कुठे वाचणार, कशावरचा खर्च वाढणार; जाणून घ्या

PMC Draft ward Structure | पुणे महानगरपालिका : प्रभाग रचनेचा नकाशा अधिकृतरित्या जाहीर, अनेकांच्या नगरसेवकपदाच्या ‘आकांक्षा’वर ‘पाणी’?; जाणून घ्या 58 प्रभागांतील मतदार संख्या

Related Posts