IMPIMP

MHADA Lottery 2021 | म्हाडाच्या घरांची सोडत जाहीर ! म्हाडाची ‘ती’ महिला कर्मचारी ठरली आजच्या सोडतीत विजेती

by nagesh
MHADA Lottery 2021 | mhadas female Chaya Rajesh Rathod employee also became the winner in todays draw

मुंबई : सरकारसत्ताऑनलाइन–  आज म्हाडा कोकण मंडळाच्या 8 हजार 948 घरांची सोडत जाहीर (MHADA Lottery 2021) करण्यात आली. म्हाडानं गेल्या महिन्यात ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील घरांसाठी लॉटरी जाहीर केली होती. या लॉटरीतील (MHADA Lottery 2021) 8 हजार 948 घरांसाठी तब्बल 2 लाख 46 हजार अर्ज आले होते. आज सकाळी ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात (Dr. Kashinath Ghanekar Natyagriha) घरांच्या सोडतीला सुरुवात झाली. यामध्ये म्हाडा ककर्मचारी छाया राजेश राठोड (Chaya Rajesh Rathod) या म्हाडा कर्मचारी गटातून विजेत्या ठरल्या आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

छाया राठोड यांच्यावर काही महिन्यापूर्वी कथित गैरव्यवहाराचे आरोप (Allegation) झाले होते.
परंतु म्हाडाच्या वरिष्ठ अधिकांनी (MHADA Lottery 2021) छाया राठोड यांची चौकशी केली असता त्यांच्यावर झालेल्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले.
त्यामुळे राठोड यांना क्लिनचिट (Clinchit) देण्यात आली होती.
राठोड या मागील 11 वर्षापासून सातत्याने म्हाडाच्या घरांसाठी अर्ज भरत होत्या.
आज झालेल्या सोडतीत कोड क्रमांक 322 आणि 323 मध्ये म्हाडा कर्मचारी गटातून त्या विजेत्या झाल्याची माहिती राजेश राठोड (Rajesh Rathod) यांनी दिली.
तसेच छाया राठोड यांच्यावर झालेल्या त्या आरोपांनंतर आजचा दिवस आमच्या कुटुंबासाठी खूप महत्त्वाचा असल्याचे राजेश राठोड यांनी सांगितले.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या हस्ते सोडतीचा आरंभ झाला. यावेळी केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील (Kapil Patil), नगरविकास मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के (Mayor Naresh Mhaske) आदी उपस्थित होते.
तर गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी ऑनलाईन कार्यक्रमाला हजेरी लावली होती. (MHADA Lottery 2021)

Web Title : MHADA Lottery 2021 | mhadas female Chaya Rajesh Rathod employee also became the winner in todays draw

हे देखील वाचा :

Pune Crime | IT इंजिनिअर महिलेला Tinder Dating App वरील ओळख पडली महागात; लग्नाच्याआमिषाने 73 लाखांचा गंडा

Pune News | हजारो महिलांच्या उपस्थितीत श्री लक्ष्मी मातेची महाआरती

Blade India | पुण्यातून मुंबईसाठी हेलिकॉप्टर सेवा सुरू

Chitra Wagh | रुपाली चाकणकर यांना ‘शूर्पणखा’ संबोधलेलं नाही, चित्रा वाघ यांचे स्पष्टीकरण (व्हिडिओ)

Related Posts