Minor Boy Suicide In Pune Pimple Saudagar | पिंपरी: पिंपळे सौदागर येथे सातव्या मजल्यावरुन उडी घेऊन 14 वर्षीय मुलाची आत्महत्या

पिंपरी :Minor Boy Suicide In Pune Pimple Saudagar | पिंपरी चिंचवड शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या पिंपळे सौदागर परिसरात खळबळ जनक घटना घडली आहे. रोजलँड सोसायटीच्या एका इमारतीच्या सातव्या मजल्यावरू 14 वर्षाच्या मुलाने उडी मारली. त्याला तातडीने पिंपळे सौदागर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. मल्हार मकरंद जोशी (वय-14) असे आत्महत्या करणाऱ्या मुलाचे नाव आहे.
मल्हार जोशी हा 9 व्या वर्गात शिक्षण घेत होता. त्याचे आई-वडील काल एका कार्यक्रमानिमित्त बाहेरगावी गेले होते. त्यामुळे तो आपल्या आईच्या मैत्रिणीच्या घरी गेला होता. तेव्हा घराच्या गॅलरीतून उडी घेता त्याने आत्महत्या केली आहे, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच सांगवी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मल्हार जोशी याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या घटनेबाबत मल्हार याच्या आई-वडीलांना माहिती देण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
स्थानिक रहिवाश्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आई-वडील बाहेरगावी गेल्याने तो शेजारी राहत होता. आज दुपारी बाराच्या सुमारास त्याच्या आई-वडिलांचा फोन आला. त्यांच्यासोबत होता. बोलत असताना त्याने मध्येच फोन कट केला आणि फोन फेकून दिला. त्यानंतर त्याने पळत जाऊन गॅलरीतून उडी मारली. पुढील तपास सांगवी पोलीस करीत आहेत.
Comments are closed.