IMPIMP

MLA Eknath Khadse | बायकोला साडी घेऊ शकत नाही, तो मर्द कसला, एकनाथ खडसेंचा शहाजीबापूंना टोला

by nagesh
MLA Eknath Khadse | jalgaon ncp leader eknath khadse criticism of shahajibapu patil maharashtra news

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन   राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि आमदार एकनाथ खडसे (MLA Eknath Khadse) यांनी सांगोल्याचे आमदार आणि शिंदे यांचे मोठे समर्थक शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांच्यावर टीका करत चिमटा काढला आहे. बायकोला साडी घेऊ शकत नाही, तो मर्द कसला असा टोला एकनाथ खडसे (MLA Eknath Khadse) यांनी पाटील यांना लगावला.

एकनाथ खडसे (MLA Eknath Khadse) शहाजीबापू पाटील यांच्यावर म्हणाले, शहाजीबापू त्यांची पूर्व परिस्थिती सांगताना म्हणतात की, त्यांच्या गरिबीच्या काळात शरद पवारांनी (Sharad Pawar) त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. बायकोला साडी घेण्यापुरते देखील त्यांच्याकडे पैसे नव्हते. हे विधान शहाजीबापूंनी कदाचित गमतीने किंवा उद्वेगाने केले असावे. आपल्या बायकोला साडी घेऊ शकत नाही, तो मर्द कसला? मात्र, शहाजीबापू पाटील जे म्हणत आहेत, ते कोणत्या हेतूने म्हणत आहेत, ते मला माहीत नाही.
आता शहाजीबापू आमदार आहेत आणि त्यांची परिस्थिती सुधारली आहे. त्यामुळे त्यांनी कोणाकडे आशेने पाहू नये.

शहाजीबापू पाटील गुवाहाटीतून आपल्या एका कार्यकर्त्याला केलेल्या फोनमुळे सुप्रिद्ध झाले आहेत.
त्यांनी त्यानंतर महाराष्ट्रात आणि त्यांच्या जिल्ह्यात अनेक ठिकाणी दौरे केले. यावेळी ते नेहमी आपली भूतकाळातील गरिबी आणि हालपेष्टा सांगतात. 1999 च्या काळात माझी परिस्थिती फार हालाकीची होती.
सतत 19 वर्षे आमच्या घरात गरिबी होती. त्यावेळी मी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात होतो.
पण मला अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार यांनी मदत केली नाही.
बायकोला नवी साडी घेण्याची देखील ऐपत नव्हती, असे ते नेहमी सांगतात.

Web Title :- MLA Eknath Khadse | jalgaon ncp leader eknath khadse criticism of shahajibapu patil maharashtra news

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

हे देखील वाचा :

Bacchu Kadu | रवी राणांनी 1 नोव्हेंबरपर्यंत मी 50 खोके घेतल्याचे पुरावे नाही दिले, तर आम्ही… – बच्चू कडूंचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना इशारा

NCP MLA Nilesh Lanke | राज्याचे पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादीचे असतील, निलेश लंके यांचे सूचक विधान

Shahajibapu Patil | 1999 चा किस्सा सांगत शहाजीबापू पाटील यांची शरद पवारांवर टीका, म्हणाले- ‘त्या’ गोष्टीचे शल्य आयुष्यभर बोचत राहील’

Related Posts