IMPIMP

MLA Gopichand Padalkar | पडळकरांचा अनिल परबांना सवाल; म्हणाले – ‘आझाद मैदानावर काय अतिरेकी बसलेत का?’

by nagesh
Gopichand Padalkar | bjp MLA gopichand padalkar challenge to anil parab on st worker strike MSRTC

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन –  MLA Gopichand Padalkar | विलिनीकरणावरुन राज्यभर एसटी कामगारांचा संप (ST workers strike) सुरू आहे. या पार्श्वभुमीवर आज (सोमवारी) राष्ट्रवादी काॅग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यात जवळजवळ 4 तास बैठक पार पडली. मात्र, अद्याप विलिनीकरणाबाबत तोडगा निघाला नसल्याची माहिती आहे. या झालेल्या बैठकीवर भाजपचे (BJP) आमदार गोपीचंद पडळकर (MLA Gopichand Padalkar) यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

काय म्हणाले पडळकर?

गोपीचंद पडळकर (MLA Gopichand Padalkar) म्हणाले की, ‘अनिल परब रोज तेचतेच शिळं बोलत आहेत, त्यांच्याकडे नवीन सांगायला काहीच नाहीत. त्यांनी येऊन आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांशी बोलावं, अशी मागणी पडळकर यांनी केली आहे. तसेच आझाद मैदानावर बसलेले हे काय कुठले अतिरेकी आहेत का? असा जोरदार सवाल देखील पडळकर यांनी केला आहे.

‘सरकार वेळकाढूपणा आणि चालढकल करण्याचं धोरण घेत आहे. मंत्री अनिल परब रोज एकच बोलत आहेत. त्यांच्या वक्तव्यात काहीच फरक नाही.
ते वेगळं काहीच सांगत नाहीत. आज एवढे महत्त्वाचे लोक बसले असतील आणि तरीही ते कालचीच वक्तव्यं करत असतील तर बैठक घेण्यात काय अर्थ नाही असं वाटतं.
त्यांनी स्पष्ट भूमिका मांडावी. हे कर्मचारी त्यांचेच आहेत ना. त्यांनी इथं यावं आणि या कर्मचाऱ्यांशी बोलावं.
हे काय कुठले अतिरेकी इथं येऊन बसले आहेत का? त्यांचेच कर्मचारी आहेत. यांचं पालकत्व त्यांच्याकडे आहे.
त्यामुळे त्यांनी सरकारच्या वतीने अधिकृतपणे यावं. कर्मचारी त्यांच्याशी बोलायला तयार आहे. असं पडळकर म्हणाले.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

पुढे गोपीचंद पडळकर (MLA Gopichand Padalkar) म्हणाले, ‘आझाद मैदानावर संप सुरू होऊन आज 13 वा दिवस आहे.
28 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून राज्यभरात संप सुरू झाला आहे.
आज 22 नोव्हेंबर ही तारीख आहे. म्हणजे हे सरकार किती असंवेदनशील आहे हे स्पष्ट होतंय.
ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेला हा एसटीचा विषय आहे.
असं असूनही मुंबईत संप सुरू झाल्यानंतर 13 व्या दिवशी बैठक घेतली. संप झाल्यापासून आज 25 दिवस झालेत. यानंतरही निर्णय नाही.
हे सरकार निर्णयक्षम नाही, यांच्यात एकमत नाही. एसटीत यांचा फार जीव गुंतलेला दिसतो.’

‘जोपर्यंत परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडून सरकारची सुस्पष्ट भूमिका येत नाही तोपर्यंत त्यावर बोलणं उचित होणार नाही.
संप सुरू झाला आणि हे प्रकरण न्यायालयात गेलं तेव्हापासून अनिल परब समितीबाबत एकच वाक्य सांगत आहेत.
त्यामुळे तेच तेच दररोज शिळं सांगणं याला काही अर्थ नाही. कर्मचारी विलिनीकरणाची मागणी करत आहे.
त्यांना दुसरं तिसरं काहीच नको आहे. त्यावर सरकार न्यायालयाचा मुद्दा सोडून काही बोललेलं नाही. असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

Web Title : MLA Gopichand Padalkar | bjp mla gopichand padalkar criticize shivsena minister anil parab over st bus protest azad maidan mumbai

हे देखील वाचा :

Parth Pawar | गाववाला व बाहेरचा वाद उभा करुन लोकांमध्ये फूट पाडण्याचे राजकारण थांबवा; पार्थ पवारांनी सत्ताधाऱ्यांना सल्ला

Legislative Council By-Election | विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसच्या प्रज्ञा सातव बिनविरोध

Petrol Diesel Price | सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी ! लवकरच स्वस्त होऊ शकते पेट्रोल-डिझेल, 7 आठवड्याच्या खालच्या स्तरावर आले कच्च्या तेलाचे दर

Related Posts