IMPIMP

MLA Gopichand Padalkar | एसटी कामगार संपावरून पडळकरांचा सरकारवर आरोप; म्हणाले – ‘मिल कामगारांचा संप चिघळवला, त्याच पद्धतीने..’

by nagesh
Gopichand Padalkar | bjp MLA gopichand padalkar challenge to anil parab on st worker strike MSRTC

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन MLA Gopichand Padalkar | मागील अनेक दिवसांपासून राज्यभर एसटी कामगारांचा संप (ST Workers Strike) सुरु आहे. यावरुन सध्या राजकारण तापलेलं पाहायला मिळत आहे. विलिनीकरणाच्या मागणीवरुन अनेक कामगार ठाम आहेत. याला विरोधकांनी पाठींबा दर्शविला आहे. यावरुन राज्य सरकारवर (Maharashtra Government) टीका केली जातेय. या पार्श्वभुमीवर विधान परिषदेचे भाजपचे (BJP) आमदार गोपीचंद पडळकर (MLA Gopichand Padalkar) यांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यावर टीका केली. ‘मुंबईतील मिल कामगारांच्या संपाप्रमाणेच एसटी संपाचीही अवस्था करण्याचा डाव असल्याचा आरोप पडळकर यांनी केला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

यावेळी बोलताना गोपीचंद पडळकर (MLA Gopichand Padalkar) यांनी एसटी संपकरी कर्मचाऱ्यांना मेस्मा लावण्याच्या विचाराचा देखील निषेध नोंदविला आहे. पडळकर म्हणाले, ‘परिवहन मंत्री अनिल परबांनी (Anil Parab) आपलं अपयश झाकण्यासाठी मी आणि सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) एसटी कर्मचाऱ्यांची डोकी भडकवत आहेत असा आरोप केला. पण 3 आठवड्यांचा कालावधी उलटल्यानंतरही ते आपल्या विभागाच्या कर्मचाऱ्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी मंत्री म्हणून अपयशी ठरले आहेत. आता ते मुघलशाही पद्धतीने मेस्मा लावण्याची धमकी देत आहेत. त्यांच्या या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो.’ असं ते म्हणाले.

पुढे गोपीचंद पडळकर म्हणाले, ‘मनापासून कर्मचाऱ्यांचा विश्वास संपादन केला असता तर आज नक्कीच काहीतरी मार्ग निघाला असता.
मुंबईत मिल कामगारांचा संप झाला आणि तो संप चिघळवला गेला आणि तसाच अनिर्णित ठेवून मिल मालकांशी हातमिळवणी करत करोडोंच्या जागा लाटल्या गेल्या,
त्या जागांमध्ये मोठा घोटाळा केला गेला.
या पद्धतीने एसटी कामगारांना (MSRTC Workers Strike) संप चिघळवून विविध ठिकाणी असलेल्या
मोक्याच्या जागांची विल्हेवाट लावण्याचा डाव अनिल परब आणि सरकारचा दिसतोय,’ असा आरोप त्यांंनी केला.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

काय म्हणाले अनिल परब?
अनिल परब (Anil Parab) यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर काल (शुक्रवारी) पत्रकार परिषदेत घेतली.
पगारवाढ आणि वेतनहमीनंतरही एसटी कर्मचाऱ्या संपावर ठाम असल्यामुळे आता राज्य सरकारकडून त्यांना सोमवारपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे.
सोमवारपर्यंत कर्मचारी कामावर रुजू झाल्यास त्यांचं निलंबन मागे घेण्यात येईल,
त्यानंतर मात्र कठोर कारवाई केली जाईल, अशी स्पष्ट भूमिका परब यांनी मांडली होती.

Web Title :- MLA Gopichand Padalkar | bjp mla gopichand padalkar targets anil parab on st workers strike mesma action on msrtc workers

हे देखील वाचा :

National Lok Adalat Pune | पुणे महापालिकेमध्ये आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 734 प्रकरणे निकाली

Life Certificate | UIDAI ने दूर केली पेन्शनर्सची सर्वात मोठी समस्या, घरबसल्या होईल Pension चे हे काम

Bigg Boss 15 | ‘बिग बाॅस 15’च्या सेटवर राखी सावंतच्या पतीने पहिल्यांदाच केलं तिला KISS

Related Posts