IMPIMP

MLA Gulabrao Patil | ‘उद्धवसाहेबांना शाखेवर जावं लागतंय ही सगळ्यात वाईट परिस्थिती’ – गुलाबराव पाटील

by nagesh
Maharashtra Political News | maharashtra minister gulabrao patil comment on ncp leader ajit pawar in jalgaon bjp govt

जळगाव : सरकारसत्ता ऑनलाइन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांना शिवसेनेच्या शांखावर (Shivsena Branch) फिरावं लागतंय, यासारखे दुसरे दुर्दैव नाही, अशी टीका एकनाथ शिंदे गटाचे (Eknath Shinde Group) जळगाव जिल्ह्यातील आमदार गुलाबराव पाटील (MLA Gulabrao Patil) यांनी केली. तसेच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी आधीच हे दौरे केले असते तर कदाचित ही वेळ आली नसती, असा टोला गुलाबराव पाटील (MLA Gulabrao Patil) यांनी लगावला आहे. ते जळगावमध्ये बोलत होते.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Yuva Sena Chief Aditya Thackeray) यांची शिवसंवाद यात्रा (Shiv Samvad Yatra) आज नाशिकच्या मनमाड येथे पोहोचली. यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांवर हल्लाबोल केला आहे. गद्दारींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देणार नाही. कारण गद्दारांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आणि त्यांची तेवढी लायकीही नसते, अशा घणाघाती शब्दांत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांवर प्रवार केला. याच सगळ्या पार्श्वभूमीवर जळगावातील पत्रकारांनी गुलाबराव पाटील यांना प्रश्न विचारले. यावेळी गुलाबराव पाटील (MLA Gulabrao Patil) यांनी ठाकरे पिता-पुत्रावर टीका केली.

 

गुलाबराव पाटील म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आजारी होते. परंतु आदित्य ठाकरे हे तर तरुण होते. आता संपूर्ण राज्यात शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून आदित्य ठाकरे दौरे करत आहेत. आदित्य ठाकरे यांनी आधीच सर्व जिल्ह्यांचे दौरे केले असते तर कदाचित आज ही वेळ आली नसती. आज आमच्या उद्धव साहेबांना शाखेवर जावं लागतंय, विनामास्क जावं लागतंय, ही सगळ्यात वाईट परिस्थिती आहे. मला असं वाटतं हेच जर मागील काळात केलं असतं तर जी आमची शिवसेना मजबूत आहे ती आणखी मजबूत झाली असती. बाळासाहेबांची ही शिवसेना अधिक मजबूत व्हावी म्हणून आम्ही हा उठाव केला आहे. या उठावाच्या माध्यमातून आम्ही शिवसेनेचं गतवैभव प्राप्त करु, असं पाटील म्हणाले.

 

बंडखोरांनी राजीनामे द्यावे, या आदित्य ठाकरे यांच्या चॅलेंजला उत्तर देताना पाटील म्हणाले,
म्ही शिवसेना सोडलेली नाही. आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray)
यांचे ओरिजिनल शिवसैनिक आहोत. त्यामुळे आमच्या राजीनाम्याचा विषयच येत नाही.
त्यामुळे बाळासाहेबांच्या शिवसैनिकाचा राजीनामा (Resignation) मागण्याचा कुणालाही अधिकार नाही.
राज्याचा विकास करणे हा आमचा ध्यास आहे, कार्यकर्त्यांची रखडलेली कामे करणं हा आमचा प्रयत्न असेल.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- MLA Gulabrao Patil | gulabrao patil attacked shivsena chief uddhav thackeray over visit mumbai shivsena shakha

 

हे देखील वाचा :

GST On Rent | तुम्हाला रेंटवर द्यावा लागेल का टॅक्स! जाणून घ्या कुणावर लागू होईल जीएसटीचा नवीन नियम

Deepak Kesarkar | आदित्य ठाकरेंना शिंदे गटाकडून ’समज’; म्हणाले – ‘तुम्ही अजून लहान आहात, आमचा अपमान केलात तर…’

Pune Crime | शहरातील गुन्हेगारांना पिस्तुल विक्री करणाऱ्या आरोपीला दत्तवाडी पोलिसांकडून अटक

 

Related Posts