IMPIMP

MLA Nitesh Rane | आमदार नितेश राणेंवर अटकेची तलवार कायम? जामीन अर्जावर उद्या निर्णय

by nagesh
BJP MLA Nitesh Rane | nitesh ranes letter to jitendra awha ajit pawar was also targeted

सिंधुदुर्ग :  सरकारसत्ता ऑनलाइन MLA Nitesh Rane | शिवसैनिकाला मारहाण प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचे पुत्र भाजपचे आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) आता चांगलेच अडचणीत सापडल्याचे दिसते. नितेश राणे यांनी न्यायालयात (Court) दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन (Pre-Arrest Bail) अर्जावर आज (बुधवारी) सुनावणी झाली. मात्र, जामीन अर्जावर उद्या (गुरुवारी) निकाल देणार असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

सिंधुदुर्ग बँक निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष परब (Santosh Parab) यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा (FIR) दाखल केला आहे. यानंतर अटक होऊ नये यासाठी नितेश राणे यांनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात (Court) धाव घेतली. मागील दोन दिवसांपासून या प्रकरणावर सुनावणी सुरूय. आज देखील कोर्टात दोन्ही बाजूच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला आहे. त्यानंतर दोन्ही वकिलांची बाजू ऐकून घेतल्यानंतर जामीन अर्जावर उद्या (गुरुवारी) सुनावणी घेणार असल्याचं न्यायालयाने सांगितलं.

आज झालेल्या सुनावणीदरम्यान, सरकारी वकील जाणूनबुजून वेळ काढत आहेत,
असं नितेश राणेंचे वकील संग्राम देसाई (Advocate Sangram Desai) म्हणाले.
तर सरकारी वकील घरत यांनी याबात आक्षेप घेतला. त्यामुळे वकील देसाई आणि सरकारी वकिल यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.
पोलीस तपास पूर्णत एकतर्फी पद्धतीने सुरू आहे. राज्याचे पोलीस महासंचालक या जिल्ह्यात येऊन बसले आहेत.
त्यांची या जिल्ह्यात काय भूमिका आहे? असा सवाल देसाई यांनी उपस्थित केला आहे.
तर, राज्याचे पोलीस महासंचालक उपस्थित आहेत तर देशाचे केंद्रीय मंत्री या जिल्ह्यात काय करत आहे? असा सवाल सरकारी वकील घरत यांनी उपस्थित केला.
दरम्यान, नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या न्यायालय काय निर्णय घेणार? हे पाहावे लागणार आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- MLA Nitesh Rane | shiv sena workers attack case bjp mla nitesh ranes bail application will be heard by the court tomorrow

हे देखील वाचा :

Pune Crime | विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक

Crime News | तब्बल 70 गाढवांची चोरी; मालकाच्या तक्रारीनंतर पोलिसांची गल्लीबोळात शोधमोहिम

Ration Card | देशातील कोणत्याही ठिकाणाहून तुम्हाला घ्यायचे असेल रेशन, तर करावे लागेल ‘हे’ काम; जाणून घ्या

Related Posts