IMPIMP

MLA Ravi Rana | आमदार रवी राणा यांचा सूर बदलला ? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनंतर आता भाजपवर निशाणा..

by nagesh
MLA Ravi Rana | ravi ranas criticism on bjp after chief minister uddhav thackeray shivaji maharaj statue issue in amaravati

अमरावती : सरकारसत्ता ऑनलाइन MLA Ravi Rana | अमरावती शहरातील (Amravati News) छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा
काढण्यासाठी पालकमंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या
सरकारने प्रशासनावर दबाव आणून हा पुतळा काढल्याचा जोरदार आरोप आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी केला होता. हा आरोप काल
(रविवारी) राणा दांपत्याने टीका करत केले होते. दरम्यान आता रवी राणा यांचा सूर बदलला की काय? असा सवाल सर्वत्र उपस्थित होतो आहे. कारण
आज राणा यांनी भाजपवर (BJP) निशाणा साधला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी अमरावतीच्या राजापेठ चौकातील उड्डाणपुलावर (12 जानेवारीला) मध्यरात्री छत्रपती
शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवला होता. या पुतळ्यासाठी लागणाऱ्या आवश्यक परवानग्या रवी राणा यांनी घेतल्या नव्हत्या. हा पुतळा बसवल्याने वाद निर्माण झाला होता. 16 जानेवारी रोजी मध्यरात्री पोलीस बंदोबस्तात प्रशासनाने हा पुतळा काढला. नंतर, अमरावतीमध्ये राजकारण चांगलेच तापले. तेव्हा त्यांनी यशोमती ठाकूर, आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केला होता.

यानंतर रवी राणा म्हणाले, ”अमरावती महानगरपालिकेमध्ये (Amravati Municipal Corporation) भाजपची (BJP) सत्ता असताना देखील त्यांनी पुतळा बसवायला परवानगी दिली नाही असा आरोप त्यांनी केला. यासंदर्भात मी भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना विचारणा करणार असल्याचेही ते म्हणाले. तर, ‘ज्या व्यावसायिकांकडून लाच मिळते त्यांच्यासाठी अमरावती महापालिका रात्री-बेरात्री बैठका घेऊन परवानगी देते. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी परवानगी द्यायला अमरावती महापालिकेकडे वेळ नाही’ अशी गंभीर टीकाही त्यांनी केली. दरम्यान, येत्या शिवजयंतीला शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा बसवणार आहे. त्यासाठी पालकमंत्री, मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी रीतसर परवानगी द्यावी अशी मागणी देखील रवी राणा यांनी केली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title : MLA Ravi Rana | ravi ranas criticism on bjp after chief minister uddhav thackeray shivaji maharaj statue issue in amaravati

हे देखील वाचा :

7th Pay Commission | खुशखबर ! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात आणखी एका भत्त्याची होणार वाढ; जाणून घ्या

Insurance Policy Tax | ‘या’ इन्श्युरन्स पॉलिसीवर मिळते 1.5 लाखापर्यंत कर सवलत, 31 मार्चपूर्वी घ्या निर्णय; जाणून घ्या

Aaradhya Abhishek Bachchan | ऐश्वर्या रायने मुलगी आराध्या आणि पती अभिषेक बच्चनसोबत ‘देसी गर्ल’ गाण्यावर केला डान्स, पाहुणेही म्हणाले…

Related Posts