IMPIMP

MLA Rohit Pawar | ‘हाय कोर्टाच्या निकालानंतरही गुणरत्न सदावर्तेंनी आंदोलकांना भडकावलं, ते भाजपची भाषा बोलत होते;’ रोहित पवारांचा आरोप

by nagesh
MLA Rohit Pawar | gunaratna sadavarte and bjp behind striking msrtc employees attack sharad pawar mumbai home says rohit pawar

अहमदनगर : सरकारसत्ता ऑनलाइन MLA Rohit Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्वर
ओक (Silver Oak) या निवासस्थानी संपकरी एसटी कामगारांनी (ST Workers) जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. त्यावेळी आंदोलकांने
दगड, चप्पलफेक देखील केली. यानंतर संपूर्ण वातावरण तापलं गेलं. यानंतर वकील गुणरत्न सदावर्ते (Adv Gunaratna Sadavarte) जबाबदार
असल्याचा ठपका ठेवत मुंबई गावदेवी पोलिसांकडून (Gamdevi Police) त्यांना अटक (Arrested) करण्यात आले. या घटनेंतर राष्ट्रवादीचे आमदार
रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

माध्यमाशी बोलताना आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी भाजप (BJP) आणि वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्लाबोल केला आहे. रोहित पवार म्हणाले, ”सिल्व्हर ओक हे शरद पवार यांची खासगी मालमत्ता आहे. शरद पवार यांच्याकडे या सरकारमध्ये कोणतेही पद नाही. न्यायालयाने एसटी संपाबाबत निकाल दिल्यानंतर कर्मचारी माघारी परतायला तयार होते. पण त्यानंतर गुणरत्न सदावर्ते आझाद मैदानात गेले. यावेळी त्यांनी भाजप प्रेरित भाषण केले. ते भाजपची बाजू मांडत होते. लोकांना भडकावत होते. न्यायालयाच्या निकालानंतरही त्यांनी एसटी आंदोलकांना भडकवणारे भाषण केले. त्यानंतर सिल्व्हर ओक वर एसटी आंदोलकांनी धडक मारल्याची घटना घडली. हा सगळा घटनाक्रम पाहता या सगळ्यामागे गुणरत्न सदावर्ते यांचा हात तर आहेत. पण यामध्ये भाजपचा हात असल्याचीही शक्यता नाकारता येत नाही.”

पुढे रोहित पवार म्हणाले, ”गुणरत्न सदावर्ते हे एसटी कर्मचाऱ्यांची केस फुकट लढवत नव्हते. त्यासाठी सदावर्ते यांना कोट्यावधी रुपये मिळाले होते. यापूर्वी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना जेव्हा-जेव्हा पगारवाढ मिळाली आहे, तेव्हा शरद पवार यांनी मध्यस्थी केली होती. फडणवीस सरकारच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांचा पगार केवळ 450 रुपयांनी वाढला. मग तेव्हा गुणरत्न सदावर्ते झोपले होते का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

दरम्यान, ”भाजप सरकारच्या काळातही एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. पण तेव्हा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) त्या बैठकीलाही गेले नाहीत. त्यामुळे आपल्याला काहीच मिळणार नाही, हे ओळखून एसटी कर्मचाऱ्यांनी माघार घेतली.
मात्र, महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi Government) एसटी कर्मचाऱ्यांचा पगार वाढवला,” असं रोहित पवार म्हणाले.

Web Title : MLA Rohit Pawar | gunaratna sadavarte and bjp behind striking msrtc employees attack sharad pawar mumbai home says rohit pawar

हे देखील वाचा :

Death of ST Employee | आंदोलक एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू

BJP leader Mohit Kumboj | लाऊडस्पीकरसाठी 5 हजार जणांनी केले अर्ज; कंपनीला दिले कंत्राट ! मोहित कुंबोज म्हणाले…

Tina Datta Stylish Look | स्टाईलिश साडी नेसून टीना दत्तानं केलं ग्लॅमरस फोटोशूट, फोटो पाहून चाहते झाले घायाळ…!

Devendra Fadnavis | ‘सगळ्यांना अडीच वाजताच मेसेज आले अन् पोलिसांना पत्ताच नव्हता, हे खूप मोठं अपयश’ – देवेंद्र फडणवीस

Related Posts