IMPIMP

MLA Rohit Pawar | शरद पवार यांच्या ‘सिल्वर ओक’वरील हल्लाप्रकरणी रोहित पवारांचं मोठं विधान; म्हणाले – ‘पोलिस प्रशासन…’

by nagesh
Rohit Pawar | rohit pawar reaction on satyajeet tambe nashik graduate constituency election ram shinde and iqubal singh chahal ed notice

जामखेड : सरकारसत्ता ऑनलाइन MLA Rohit Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील सिल्वर ओक (Silver Oak) या निवासस्थानी झालेल्या हल्लाप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी मोठं विधान केलं आहे. या प्रकरणात पोलीस प्रशासन कमी पडले असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मात्र, आता आंदोलनकर्त्यांची डोकी कोणी भडकावली, गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) हे कोणाच्या इशाऱ्यावर काम करत आहेत, याचा शोध लवकरच घेतला जाईल, असं देखील रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

जामखेड तालुक्यातील (Jamkhed) नवनियुक्त सेवा संस्थेचे संचालक, चेअरमन, व्हाईस चेअरमन यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी रोहित पवार (MLA Rohit Pawar) माध्यमांशी बोलत होते. ”संपूर्ण महाराष्ट्राला ही घटना योग्य वाटलेली नाही. पण भाजपाचे (BJP) काही लोक टिव्हीवर दिसण्यासाठी वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. आम्हाला शरद पवार साहेबांनी शांत राहण्याचे आवाहन केले आहे, नाहीतर भाजपाचे अनिल बोंडे (Anil Bonde) यांचे काय झाले असते हे सांगता येत नाही,” असं देखील रोहित पवार म्हणाले.

”या आंदोलनात कोणाचा हात आहे हे लवकरच बाहेर येईल.
सदावर्ते कोणाच्या इशाऱ्यावर चालत आहे, हे देखील स्पष्ट होईल.
कारण भाजपाने अनेक पुरस्कार सदावर्ते यांच्या घरच्यांना दिलेले आहेत.
करोडो रुपये फी घेतली व एसटी आंदोलन भरकटवले आणि हे आता कर्मचाऱ्यांना कळून चुकले आहे.”
असं रोहित पवार म्हणाले. दरम्यान, शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्लाप्रकरण हाताळण्यात राज्याचे गृहखाते कमी पडले का?,
या सवालानंतर रोहित पवार म्हणाले, ”काही प्रमाणात पोलिस प्रशासनाचे हे अपयश आहे.
55 वर्षांत कधीही असा प्रकार घडला नाही.” असं ते म्हणाले.

Web Title :- MLA Rohit Pawar | mla rohit pawar has said that the police administration has failed in the case of attack on sharad pawars house

हे देखील वाचा :

Bitcoin Case Pune | बिटकॉईन तपासातील सहभागी पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी

MNS MLA Raju Patil | ‘आम्ही कोणाच्या दाढीला पक्ष बांधलेला नाही’; संपलेल्या पक्षाला मी उत्तर देत नाही म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना मनसेचं प्रत्युत्तर !

Multibagger Penny Stock | 19 पैशाच्या स्टॉकची कमाल, 12 महिन्यातच गुंतवणुकदारांच्या 1 लाखाचे केले 25 लाख रुपये

Related Posts