IMPIMP

MLA Siddharth Shirole | विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल जानेवारी 2024 पर्यंत व्हावा; आमदार शिरोळे यांची मागणी

by nagesh
 MLA Siddharth Shirole | Flyover at Pune Vidyapeeth Chowk to be done by January 2024; Demand of MLA Shirole

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – MLA Siddharth Shirole | वाहतुकीचा ताण लक्षात घेऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे (Pune University Chowk Flyover) काम जानेवारी २०२४ पर्यंत पूर्ण व्हावे, अशी जोरदार मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणाच्या (पुम्टा) च्या बैठकीत PUMTA Meeting आज (बुधवारी) केली. (MLA Siddharth Shirole)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

विभागीय आयुक्त सौरभ राव (IAS Saurabh Rao) यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. बैठकीला आमदार शिरोळे यांच्यासह पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar), पीएमआरडीए चे आयुक्त राहुल महिवाल (Rahul Mahiwal), वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त विजय मगर (DCP Vijaykumar Magar), तसेच पीएमआरडीए चे अधिकारी, पुणे महापालिकेचे अधिकारी व टाटा कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. (MLA Siddharth Shirole)

पुणे व परिसरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेस चालना देणे, वाहतूक विषयक विविध समस्या सोडविणे याकरिता बैठक आयोजित करण्यात आली होती.

बैठकीमध्ये चर्चा झाली. पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल जानेवारी २०२४ पर्यंत पूर्ण करावा अशी जोरदार मागणी आमदार शिरोळे यांनी केली.
तसेच हा उड्डाणपूल करताना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करता येऊ शकतो का? याचा सर्व्हे टाटा कंपनी करणार
असून त्या सर्व्हेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास आणि उड्डाणपूल उभारणीचा कालावधी कमी होत असेल
तर याबाबत राज्य सरकारकडे (Maharashtra Govt) प्रस्ताव पाठविण्यात येईल, असे बैठकीत ठरविण्यात आले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- MLA Siddharth Shirole | Flyover at Pune Vidyapeeth Chowk to be done by January 2024; Demand of MLA Shirole

हे देखील वाचा :

NCP MLA Rohit Pawar | ‘बागेश्वर बाबाला उपरती झाली, पण मुंबईत बसलेल्या बाबाला…’ रोहित पवारांचा राज्यपालांना टोला

BJP MLA Nitesh Rane | उद्धव ठाकरेंवर टीका करताना नितेश राणेंची जीभ घसरली, म्हणाले-‘उद्धव ठाकरे हे नाXX…’

Budget 2023 | अर्थसंकल्पातील शेतकऱ्यांसाठीच्या योजनांवरून राजू शेट्टींनी केंद्र सरकारला फटकारले; म्हणाले…

Related Posts