IMPIMP

MLA Sunil Raut | ‘…तर संजय राऊत साडेतीन महिने तरुंगात गेले नसते’, नितेश राणेंच्या ‘त्या’ टीकेला सुनील राऊतांचे सडेतोड प्रत्युत्तर

by nagesh
MLA Sunil Raut | sunil raut reply nitesh rane over sanjay raut change colour lizard

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – भाजपचे आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांच्यावर पत्रकार परिषदेत टाका केली. संजय राऊत रंग बदलणारा सरडा आहे. कोणाचीतरी सुपारी घेवून नुसतं आग लावण्याचं काम ते करतात, अशी टीका राणे यांनी केली आहे. राणे यांच्या टीकेला आमदार सुनील राऊत (MLA Sunil Raut) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. भाजपने (BJP) काही कुत्रे पाळले आहेत. शिवसेनेवर भुंकणे हे एकच काम त्यांना दिले आहे, अशा शब्दात सुनील राऊत (MLA Sunil Raut) यांनी नितेश राणेंच्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.

काय म्हणाले नितेश राणे?

नितेश राणे म्हणाले, संजय राऊत रंग बदलणारा सरडा आहे. ते उरलेली शिवसेनाही (Shivsena) संपवतील. महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) गौतमी पाटील (Gautami Patil) म्हणजे संजय राऊत आहेत. गौतमी जशी वेगवेगळ्या कार्यक्रमात जाऊन लोकांचं मनोरंजन करते, नाचते, लोकांना नाचवते, ती एक उत्तम कलाकार आहे. शिवाय लोकांमध्ये लोकप्रिय आहे. गौतमी पाटील मनोरंजन करत असल्याने लोकांना बघायला आवडतं. पण गौतमीसारखं राऊत रोज सकाळी येऊन लोकांच मनोरंजन करतात.

…तर साडेतीन महिने तुरुंगात गेले नसते

नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर केलेल्या टीकेला सुनील राऊत (MLA Sunil Raut) यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना प्रत्युत्तर दिले. महाराष्ट्र आणि देशाला माहिती सरड्यासारखं रंग कोण बदलतं. संजय राऊत सरड्यासारखे रंग बदलत असते, तर साडेतीन महिने तुरुंगात गेले नसते. तुरुंगाच्या भीतीने काँग्रेस (Congress), भाजप, स्वाभिमान असं अनेक रंग बदलणारे कोण आहेत? त्यामुळे नितेश राणे काय बोलतात याला किंमत देण्याची गरज नसल्याचे सुनील राऊत म्हणाले.

शिवसेनेवर भुंकणे हे एकच काम

नितेश राणे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत यांच्यासह तेजस ठाकरे (Tejas Thackeray)
यांच्यावरही टीका केली होती. यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सुनील राऊत म्हणाले,
भाजपने काही कुत्रे पाळले आहेत. शिवसेनेवर भुंकणे हे एकच काम त्यांना आहे.
पण, शिवसेना ही वाघ आणि हत्तीसारखी आहे. अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करावे.
शिवसेना मजबूत असून, उद्धव ठाकरेंचं (Uddhav Thackeray) नेतृत्व खंबीर असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title : MLA Sunil Raut | sunil raut reply nitesh rane over sanjay raut change colour lizard

Related Posts