IMPIMP

MNS Chief Raj Thackeray – Ajit Pawar | राज ठाकरेंनी अजित पवारांचं ‘ते’ आव्हान स्विकारलं? पुण्यात ‘या’ दिवशी होणार ‘राज’गर्जना

by nagesh
Ajit Pawar - Raj Thackeray | ajit pawar comment on mns chief raj thackeray speech in mumbai

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – MNS Chief Raj Thackeray – Ajit Pawar | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांची पुण्यात (Pune) सभा होणार की नाही? यावर मोठी चर्चा रंगली आहे. राज ठाकरे यांची सभा नदीपात्राऐवजी आता गणेश कला क्रीडा मंच सभागृहात (Ganesh Kala Krida Manch Hall) सकाळी होणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी एका सभेदरम्यान बोलताना राज ठाकरे यांना दिवसा सभा घेण्याचं आव्हान दिलं होतं. तर अजित पवारांचे आव्हान राज ठाकरेनी स्वीकारलं असल्याची चर्चा रंगताना दिसत आहे. (MNS Chief Raj Thackeray – Ajit Pawar)

राज ठाकरेंची नदीपात्रात सभा होणार असल्याचं निश्चित झालं होतं. पण, हवामान खात्याचा अंदाज पाहता पाऊस कधीही येऊ शकतो. अशा परिस्थितीत अचानक पाऊस आला तर हजारो लोकांना त्रास होईल. या कारणामुळे 21 ऐवजी 22 मे रोजी गणेश कला क्रीडा मंच इथे सकाळी 10 वाजता सभा घेण्याचा निर्णय राज ठाकरे यांनी घेतला असल्याची माहिती मनसे नेते बाबू वागस्कर (MNS Leader Babu Wagaskar) यांनी दिली.

काही दिवसांपुर्वी अजित पवारांनी नाशिकमध्ये घेतलेल्या सभेमध्ये राज ठाकरेंवर निशाणा साधला होता. ”आम्ही सकाळी, दुपारी सभा घेतो. यांनी कधी दूपारी सभा घेतली का? असा सवाल त्यांनी केला होता. तसेच, कधी कष्ट घेतले आहेत का? यांची सभा कधी संध्याकाळी. उगीच लोकांची दिशाभूल करायची, हे तुमच्या माझ्या महाराष्ट्राला परवडणारे नाही. राजकीय स्वार्थापोटी समाजामध्ये फूट पाडण्याचे काम सुरुय. चांगले वातावरण गढूळ करण्याचे काम काही लोकांकडून केले जातेय,” असं अजित पवारांनी म्हटले होते. यानंतर आता राज ठाकरे यांनी थेट पुण्यात सभा आयोजित केली आहे. ती सभागृहात होणार असल्याची माहिती आहे.

Web Title :- MNS Chief Raj Thackeray – Ajit Pawar | MNS chief Raj Thackeray accepts Ajit Pawar’s that challenge?

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

हे देखील वाचा :

Ajit Pawar On Journalist | सवाल करताच अजित पवार वैतागले; म्हणाले – ‘हम बहुत गंभीर है, अभी स्टॅम्प पेपरपे लिखके दू’

Aurangabad Crime | 20 वर्षाच्या तरुणीच्या डोक्यात रॉडने वार करुन गळा आवळून खून, मित्र फरार

Pune Crime | पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे आणि साईनाथ बाबर यांच्यावर गुन्हा दाखल; जाणून घ्या प्रकरण

Related Posts