IMPIMP

MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरेंच्या अडचणीत वाढ ! बीड कोर्टाचं अजामीनपात्र वॉरंट जारी

by nagesh
MNS Chief Raj Thackeray | court issues non bailable warrant against raj thackeray in parli of beed district

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन MNS Chief Raj Thackeray | मागील काही दिवसात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांच्या विरोधात सांगलीच्या शिराळा न्यायालयाने (Shirala Court) अजामीनपात्र वॉरंट (Non-Bailable Warrant) काढलं आहे. त्यानंतर आता राज ठाकरे यांच्या विरोधात परळी न्यायालयानेही (Parli Court) अजामीनपात्र वॉरंट बजावलं असल्याचे समोर आलं आहे. यामुळे राज ठाकरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मराठी पाट्याबाबत झालेल्या आंदोलनाप्रकरणी हे वॉरंट जारी झाले असल्याची माहिती मिळत आहे,

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

2008 मध्ये मराठी पाट्या आणि मराठी भाषेवरून मनसेच्या वतीने बीड (Beed) जिल्ह्यातील परळी येथे आंदोलन करण्यात आले होते. परळी येथे त्यावेळी जबरदस्ती दुकाने बंद करण्यासाठी मनसेने पुढाकार घेतला होता. याप्रकरणी एक गुन्हा (FIR) दाखल झाला होता. या पार्श्वभूमीवर परळी कोर्टाकडून वॉरंट जारी करण्यात आलं आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या (MNS Chief Raj Thackeray) अडचणीत वाढ झाली आहे.

दरम्यान, वॉरंट संदर्भात एक पत्र मुंबई पोलिसांना (Mumbai Police) मिळालं असून या प्रकरणात आता मुंबई पोलिसही अ‍ॅक्शन मोडमध्ये असल्याची माहिती मिळत आहे.
त्यामुळे आता याबाबत कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येणार असल्याचे वृत्त पसरलं आहे.
दरम्यान, या नव्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा हा वाद पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तसेच, परळी कोर्टाचं अजामीनपात्र वॉरंट या प्रकरणात आता गृहखातेही अ‍ॅक्शन मोडमध्ये येण्याची शक्यता आहे.
त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात गृहखाते कारवाई करेल अशी चर्चा आहे.

Web Title :- MNS Chief Raj Thackeray | court issues non bailable warrant against raj thackeray in parli of beed district

हे देखील वाचा :

Pune Crime | लग्नासाठी वेळ मागून घेतल्याने अश्लील फोटो आईवडिलांना पाठवून केली बदनामी; जळगावमधील तरुणावर कोंढवा पोलिसांनी केला गुन्हा दाखल

MLA Ravi Rana On Thackeray Government | रवी राणांचा ठाकरे सरकारवर घणाघात; म्हणाले – ‘बजरंग भक्त अन् राम भक्त त्यांना धडा शिकवतील’

Power Outage Pune | …म्हणून रविवारी पहाटे पुण्यातील नगर रोड, विमान नगर, कल्याणी नगर, येरवडा भागातील वीज पुरवठा बंद राहणार

Related Posts