IMPIMP

MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी, पत्रात ‘या’ भाषेतील शब्दांचा वापर

by nagesh
MNS | mns manoj chavan tweet diwali firecrackers masjid loudspeaker mumbai police

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनमनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांना जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill)
मिळाली आहे. बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे
यांच्या केसाला जरी धक्का लागला तर महाराष्ट्र पेटेल असा इशारा त्यांनी दिला आहे. धमकीच्या पत्रामध्ये उर्दू शब्दांचा (Urdu Words) वापर करण्यात
आला असल्याची माहिती नांदगावकर यांनी दिली. राज्य (State Government) आणि केंद्र सरकारने (Central Government) याची दखल घ्यावी,
अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

या प्रकरणात नांदगावकर यांनी आज गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील (Home Minister Dilip Walse – Patil) यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. नांदगावकर यांनी पोलीस आयुक्त संजय पांडे (Mumbai CP Sanjay Pandey) यांची भेट घेतली. तसेच त्यांना या पत्राची प्रतही दिली.

नांदगावकर म्हणाले, मला आणि राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी आली आहे.
या पत्राची प्रत मी काल पोलीस आयुक्त संजय पांडे यांना दिली आहे. गृहमंत्र्यांशी देखील बोलणं झालं आहे.
हे पत्र कोणाकडून आलंय याबद्दल माहिती नाही. नांदगावकरला धमकी दिली तर ठीक आहे पण मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांच्या केसाला धक्का लागला तर राज्य पेटल्याशिवाय राहणार नाही, याची दखल राज्य आणि केंद्र सरकारने घ्यावी, असेही ते म्हणाले.

Web Title :- MNS Chief Raj Thackeray | mns chief raj thackeray death threat from letter leader Bala Nandgaonkar said

हे देखील वाचा :

Bollywood Actress Fitness Tips | वयाच्या 45 व्या वर्षी सुद्धा दिसतात ‘या’ अभिनेत्री अत्यंत फिट, जाणून घ्या त्यांची नाव..

Sadabhau Khot | मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांबद्दल बोलताना सदाभाऊ खोतांची जीभ घसरली, म्हणाले…

Ibrahim Ali Khan Girlfriend | सैफ अली खानचा मुलगा करतोय ‘या’ अभिनेत्रीच्या मुलीला डेट..

Related Posts