IMPIMP

MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरेंच्या समर्थनार्थ अमेरिकेत घुमला हनुमान चालीसेचा आवाज (Video)

by nagesh
MNS Chief Raj Thackeray | mns chief raj thackeray death threat from letter leader Bala Nandgaonkar said

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन MNS Chief Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंगे उतरवा असे सांगतानाच जर कोणी उतरवत नसेल, आवाजाचा त्रास होत असेल तर त्या ठिकाणी मशिदीसमोर मोठ्या आवाजात हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) लावण्याचे आदेश मनसैनिकांना दिले होते. त्यांनी केलेल्या आवाहनाला संपूर्ण देशभरातून पाठिंबा मिळत आहे. राज्यातही आज अनेक ठिकाणी भोंग्यविना अजान झाली. तर काही ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी हनुमान चालीसा चालवली. पोलिसांनीही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशेष खबरदारी घेतली होती. तर काही ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांची (MNS Activists) धरपकड केली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

दरम्यान, राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत एका मराठी युवकाने चक्क अमेरिकेत (America) मोठ्या आवाजाने हनुमान चालीसा लावली. त्याचा व्हिडिओही संबंधित तरुणाने पोस्ट केला आहे. या युवकाने केवळ व्हिडीओ पोस्ट केला नाही त्या पोस्टमध्ये तो म्हणतो की, इतक्या वर्षांनंतर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे स्वप्न साकार होत आहे. हिंदुस्थानात हनुमान चालीसेचा गजर होतोय. रस्त्यावर उतरलेल्या मनसे कार्यकर्त्यांना माझा पाठिंबा आहे. राज ठाकरे आप आगे बढो, पुरा हिंदुस्थान आपके साथ है, अशा शब्दात त्याने जय श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी घोषणा दिली आहे.

मुस्लीम बांधवांची सामाजिक बांधिलकी
राज ठाकरे यांच्या आदेशानुसार आज हनुमान चालीसा लावण्याची मनसे कार्यकर्त्यांनी तयारी केली होती. राज्यातील अनेक भागात हनुमान चालीसा लावली. मात्र, पनवेल, मुंब्रा, वांद्रे, भिवंडी, माहीम या ठिकाणी पहाटेची अजान भोंग्याविना झाली. याशिवाय राज्यात अन्य भागातही सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) आदेशानुसारच भोंग्याविना अजान झाली त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनीही राज ठाकरे यांच्या आदेशाचे पालन केले. वांद्रे येथील जामा मशीद, मुंब्रा येथील दारुफाला मशिदीतही बांग देण्यात आली नाही. त्यामुळे मुस्लीम समाज बांधवांचे मनसेने आभार मानले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

त्या’ मशिदींच्या परिसरात कोणालाही त्रास नको
ज्या मशिदींनी सामाजिक भान ठेवत भोंगे उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.
त्या मशिदींसबंधीत लोकांच्या स्तुत्य निर्णयाचे मी स्वागत करतो.
ज्या मशिदींनी भोंगे उतरवले आहेत त्या मशिदींच्या परिसरात कोणालाही त्रास होणार नाही याची हिंदू बांधवांनी काळजी घ्यावी,
असं आवाहन राज ठाकरे यांनी मनसैनिकांना केलं होत.

Web Title :- MNS Chief Raj Thackeray | MNS chief raj thackeray hanuman chalisa played in america to support raj thackeray watch the video

हे देखील वाचा :

Navneet Rana-Ravi Rana | राणा दाम्पत्याला न्यायालयाकडून जामीन मंजूर; अखेर 12 दिवसानंतर कोठडीतून सुटका

Supreme Court On Maharashtra Municipal Elections | सर्वोच्च न्यायालयाचा आदेश ! 2 आठवड्यात महापालिका निवडणुका जाहीर करा

Pune Water Supply | गुरुवारी (उद्या) पुणे शहरातील ‘या’ भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार

Indian Oil Company Function | धक्कादायक ! इंडियन ऑईलच्या कार्यक्रमात स्क्रिनवर अचानक अश्लिल Movie; केंद्रीय मंत्री होते उपस्थित

Related Posts