IMPIMP

MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरेंना नवी उपाधी; ‘हिंदू जननायक’ म्हणून औरंबादमध्ये झळकले बॅनर !

by nagesh
MNS Chief Raj Thackeray | MNS Chief raj thackeray meeting mns hoisted banners all over the city

औरंगाबाद : सरकारसत्ता ऑनलाइन MNS Chief Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी (MNS Chief Raj Thackeray) 1 मे ला मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा घेणार असल्याची घोषणा केली होती. याच पार्श्वभूमीवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी शहरामध्ये जोरदार बॅनरबाजी केली आहे. सभेच्या मैदानाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर हे बॅनर लावण्यात आले असून यातील निराला बाजार परिसरातील मुख्य चौकातील एका बॅनरची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

निराला बाजाराच्या परिसरामध्ये लावलेल्या बॅनरवर, राज ठाकरे यांचा ‘हिंदू जननायक’, (Hindu Jananayaka) असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यासोबतच बॅनरवर, ‘राज तिलक की करो तैयारी, आ रहे है भगवा धारी’, असं लिहिण्यात आलं आहे. तर ‘जागर हिंदुत्वाचा ऐतिहासिक राज सभेचे साक्षीदार व्हा, असं आवाहनही करण्यात आलं आहे.

राज ठाकरेंच्या सभेला परवानगी देण्यावरून राजकारण केलं जात असल्याचा आरोप मनसेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यासोबतच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Vanchit Bahujan Aaghadi Chief Prakash Ambedkar) यांनी या सभेला परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी प्रशासनाला केली होती.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

दरम्यान, मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) औरंगाबाद शहर दौऱ्यावर आहेत.
सभेच्या तयारीसाठी आढावा बैठक होणार आहेत. बाळा नांदगावकर यांनी पोलीस आयुक्त यांच्याशी परवानगीबाबत चर्चा करणार असल्याचं बोललं जात आहे.

Web Title :- MNS Chief Raj Thackeray | MNS Chief raj thackeray meeting mns hoisted banners all over the city

हे देखील वाचा :

Sun Charged Water | सूर्याच्या प्रकाशात ठेवलेले पाणी बनते अमृत, आयुर्वेदाने सांगितले आश्चर्यकारक फायदे; जाणून घ्या

Airtel Payments Bank FD | एफडी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! ‘ही’ बँक देतेय अधिक व्याज आणि सुविधाही

Pune Crime | बाल विवाह केल्याप्रकरणी पती आणि मुलीच्या वडिलांवर FIR

Related Posts