IMPIMP

MNS Chief Raj Thackeray | ‘हे कायमचे थांबले नाही तर हनुमान चालिसा लावली जाणारच’; राज ठाकरेंचा पुन्हा इशारा

by nagesh
MNS | eknath shindes 15 year old grandson of eknath shinde mns reminded balasaheb didnt like it

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन MNS Chief Raj Thackeray | भोंगा (Loudspeaker) आणि हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) यावरुन राज्यात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. औरंगाबादमधील सभेनंतर पोलिस अ‍ॅक्शन मोडमध्ये येत मनसे कार्यकर्त्यांची धरपकड करत आहेत. एकिकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांच्या आदेशानंतर मनसे कार्यकर्ते (MNS Activists) आक्रमक झाल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे पोलीसही अ‍ॅक्शन मोडमध्ये आहेत. यानंतर याबाबत राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

माध्यमांशी बोलताना राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) म्हणाले की, ”90 टक्के ठिकाणी अजान बंद झाली. तर काही ठिकाणी 5 वाजायच्या आत लागली. काही ठिकाणी कमी आवाजात झाली. पोलिसांनी 5 वाजायच्या आत अजान झाली त्यावर कारवाई करणार का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच, लोकांना जो त्रास होत होता, तो कमी होईल. हा विषय श्रेय लाटण्याचा नाही. लोकांचा त्रास कमी होणे आहे. मशिदींवरील भोंगे कायमचे थांबले नाही तर हनुमान चालिसा लावली जाणारच,” असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, ”मशिदींवर कारवाई केली पाहिजे. 35 मशिदींवर कारवाई केली पाहिजे.
अनधिकृत भोंग्याना परवानगी कशाला दिली गेली आहे. यांनीही रोजच्या रोज परवानगी मागीतली पाहिजे.
सर्वोच्च न्यायालयाने जे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे झाले पाहिजे.” तसेच, ‘हा विषय आजचा नाही तर तो कायमचा आहे.
हा धार्मिक विषय नाही. धार्मिक वळण दिलं तर आम्हीही तसेच करु,’ असा इशाराही त्यांनी दिला.
तसेच ते म्हणाले, भोंगा वाजला तर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लागणारच. पोलिसांनी भोंग्यावर कारवाई केली पाहिजे. जर हे थांबले नाही तर पुन्हा उत्तर दिले जाईल.

Web Title :-  MNS Chief Raj Thackeray | mns chief raj thackerays press conference in mumbai

हे देखील वाचा :

Pune Crime | कैलास स्मशानभूमीतील जळीत प्रकरणात भाजलेल्या एकाचा मृत्यु; रॉकेल टाकणार्‍याला अटक

MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरेंच्या समर्थनार्थ अमेरिकेत घुमला हनुमान चालीसेचा आवाज (Video)

Navneet Rana-Ravi Rana | राणा दाम्पत्याला न्यायालयाकडून जामीन मंजूर; अखेर 12 दिवसानंतर कोठडीतून सुटका

Related Posts