IMPIMP

MNS Chief Raj Thackeray | ‘…तर रस्त्यावरील संघर्ष पहावा लागेल’, राज ठाकरेंवर गुन्हा दाखल होताच मनसेने दिला इशारा

by nagesh
Raj Thackeray-Maharashtra Karnataka Border Issue | maharashtra karnataka border dispute mns chief raj thackereay warning to bommai

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनमनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांच्यावर औरंगाबादमध्ये (Aurangabad) गुन्हा (FIR)
दाखल झाला आहे. औरंगाबादमधील सभेतील भाषणानंतर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. औरंगाबाद पोलिसांनी मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS
Chief Raj Thackeray) यांच्यासह आयोजकांवर ही गुन्हा दाखल केला आहे. राज ठाकरे यांच्या भाषणाचे व्हिडिओ पाहिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे (MNS Leader Sandeep Deshpande) यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना संघर्ष करण्याचा इशारा दिला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

संदीप देशपांडे म्हणाले, सुरुवातीपासूनच ज्या पद्धतीने सभेला परवानगी न देणं, जाचक अटी टाकणं सुरु होतं यावरुन राज्य सरकारचा (Maharashtra State Government) राज ठाकरे यांना अडवण्याचा प्रयत्न असल्याचे दिसत होतं. सभेला इतकेच लोक असले पाहिजेत अशी अट याआधी घातली होती का ? राज्य सरकारचा पोलिसांवर दबाव असल्याने गुन्हा दाखल झाला आहे. यामधील एकही कलम हे काद्याच्या कसोटीवर टिकणार नाही, असे संदीप देशपांडे यांनी सांगितले.

सरकारने संघर्षाची तयारी ठेवावी
औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांना अटक (Arrest) होण्याच्या शक्यतेबाबत विचारले असता देशपांडे म्हणाले, जर अशाप्रकारे सरकार वागत असेल तर रस्त्यावरील संघर्ष पहावा लागेल. तुम्ही अन्यायकारकरित्या अडकवणार असाल तर महाराष्ट्र सैनिक संघर्षाला तयार आहे. मग सरकानेही संघर्षाची तयारी ठेवावी.

उद्याचे आंदोलन होणारच
गुन्हे दाखल होण्याला आम्ही घाबरत नाही. आमच्यावर अनेक केसेस आहेत. 16 वर्षापासून आम्ही संघर्ष करत आहोत. उद्या होणाऱ्या आंदोलनाच्या (Agitation) पार्श्वभूमीवर घाबरण्यासाठी राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. परंतु महाराष्ट्र सैनिक घाबरणार नाही. 100 टक्के उद्या आंदोलन होणार असंही संदीप देशपांडे यांनी सांगितले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

हे सरकार नालायक ठरत आहे
कारवाई होताना दिसत नाही. कृती आणि बोलण्यात अंतर आहे.
एकीकडे अनधिकृत लाऊडस्पीकर लावण्यास परवानगी देण्याचा सपाटा लावणार आणि हिंदू मंदिरांवर परवानगी देत नाही ही कृती कोणत्या कायद्याखाली येते.
बाळासाहेबांचे (Balasaheb Thackeray) विचार पुढे नेण्यात हे सरकार नालायक ठरत असल्याचे देशपांडे म्हणाले.

Web Title :- MNS Chief Raj Thackeray | mns sandeep deshpande raj thackeray aurangabad police maharashtra government

हे देखील वाचा :

Maharashtra Intelligence Department Alert | गुप्तचर विभागाचा अलर्ट ! परराज्यातील लोक महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था बिघडवू शकतात

CM Uddhav Thackeray | ‘कोणाच्याही आदेशाची वाट पाहू नका’ ! CM उद्धव ठाकरेंचे पोलिसांना स्पष्ट निर्देश

MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरेंवर औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल; आता नेमके पर्याय काय ?, कोणती कलम लावण्यात आली ?

Related Posts