IMPIMP

MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरेंकडून 12 अटींचे उल्लंघन, FIR मध्ये राज ठाकरे मुख्य आरोपी; ‘या’ कलमान्वये गुन्हा दाखल

by nagesh
MNS Chief Raj Thackeray | mns chief raj thackeray surgery postponed due to covid

औरंगाबाद : सरकारसत्ता ऑनलाइनमनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांची 1 मे रोजी औरंगाबादमध्ये सभा (Aurangabad Public Rally) झाली. सभा घेण्यासाठी औरंगाबाद पोलिसांनी (Aurangabad Police) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना 16 अटी (Condition) घातल्या होत्या. मात्र सभेत 12 अटींचे उल्लंघन केल्याने सभेचे आयोजक राजीव जावळीकर (Organizer Rajiv Jawalekar) व राज ठाकरे यांच्या विरोधात औरंगाबाद येथील सिटी चौक पोलीस ठाण्यात (City Chowk Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखील गुप्ता (Aurangabad CP Nikhil Gupta) यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सभेला 16 अटी घालून परवानगी दिली होती. सीटी चौक पोलीस ठाण्यात भादंवि कलम 116, 117, 153अ आणि मुंबई पोलीस कायदा (Mumbai Police Act) अधिनियम 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी अशोक गिरी यांची नेमणूक केली आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील (Aurangabad) सभेबाबत बोलताना डीजीपी म्हणाले, राज ठाकरे यांच्यावर औरंगाबादमधील भाषणाचा स्थानिक पोलीस आयुक्तांनी अभ्यास केला असून या प्रकरणात काही सापडल्यास आजच कारवाई करणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. औरंगाबादच्या भाषणात भडकाऊ वक्तव्य केल्याने कार्यकर्ते आणि अन्य नेत्यांवर कारवाई होणार असल्याचे समोर आले आहे.

Web Title :- MNS chief raj thackeray the main accused in the fir filed a case under this section aurangabad police

हे देखील वाचा :

Ajit Pawar | अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना सूचना, म्हणाले – ‘गाफिल न राहता कामाला लागा, निवडणुका घोषित होऊ शकतात’

MNS Chief Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल; राज्यात घडामोडींना वेग

Rahul Gandhi Night Club Video | राहुल गांधींचा परदेशातील नाईट क्लबमधील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

Related Posts