IMPIMP

MNS Chief Raj Thackeray | तात्काळ अटक नाही ! राज ठाकरे यांच्या भाषणाबाबत पोलिसांची ‘Wait And Watch’ ची भूमिका

by nagesh
MNS Chief Raj Thackeray | wait and watch role of police regarding raj thackerays speech in aurangabad no immediate arrest

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन MNS Chief Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्याबाबत दिलेल्या इशाऱ्यानंतर राज्यात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. औरंगाबादमधील (Aurangabad) झालेल्या सभेनंतर पोलिस अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांची (MNS Activists) धरपकड सुरू आहे. आता राज ठाकरे यांच्या भाषणाबाबत पोलिसांनी वेट अ‍ॅण्ड वॉचची (Wait And Watch) भूमिका घेतली असुन तातडीने अटक करण्याची गरज नसल्याची पोलिसांनी सांगितले आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

औरंगाबाद पोलिसांनी (Aurangabad Police) प्रक्षोभक भाषणप्रकरणी राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) आणि आयोजक राजीव जावळीकर (Rajiv Jawalikar) यांच्याविरोधात गुन्हे (FIR) दाखल केले आहेत. तर, राज ठाकरे यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे. परंतु, लावलेली कलमे जामीनपात्र आहेत. या संदर्भात तपास सुरु आहे. मात्र तातडीने अटक करण्याची गरज नाही, असं पोलिसांनी सांगितलं. तसेच, राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला असला तरी त्यांच्यावर तात्काळ अटकेसारखी कुठलीही कारवाई होणार नाही, चौकशी करणं, नोटीस देणं हे जरी सुरू असलं तरी अटकेसारखी कारवाई इतक्यात होणार नाही. असं वरिष्ठ पोलिसांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांच्यावर औरंगाबाद येथील सभेतील भाषणप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यांच्यावर चिथावणीखोर भाषण केल्याचा ठपका ठेवण्यात आला असून अनेक कलमे लावण्यात आली आहेत.
औरंगाबादच्या सिटी चौक पोलीस ठाण्यात (City Chowk Police Station) हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एफआयआरमध्ये राज ठाकरे यांना आरोपी नंबर एक करण्यात आले. त्यामुळे त्यांना अटक होणार का ? असे प्रश्न उपस्थित होत होते.
मात्र वरिष्ठ पोलिसांच्या माहितीनुसार तातडीने कोणालाही अटक करण्याची गरज नसल्याचं सांगण्यात आलं आहे.

Web Title :- MNS Chief Raj Thackeray | wait and watch role of police regarding raj thackerays speech in aurangabad no immediate arrest

हे देखील वाचा :

Bhendval Prediction | भेंडवळची भविष्यवाणी; राज्यातील रोगराई होणार कमी, पाऊसही चांगला

Pune Crime | पुण्यातील म्हाडाच्या ‘प्राईम लोकेशन’ ला असलेल्या जमिनीवर बेकायदा ताबा ! स्वारगेट पोलीस ठाण्यात दोन महिलांसह 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Pune PMC Water Supply Issue In 23 Villages | PMRDA अथवा ग्रामपंचायत कधी पाणी पुरवठा करणार ? याची शाश्‍वती नसतानाच 23 गावांत केवळ प्रतिज्ञापत्राद्वारे बांधकाम परवानग्या दिल्याने ‘पाण्याची’ समस्या झाली बिकट

Related Posts