IMPIMP

MNS | राज्यपालांच्या वक्तव्याचा मनसेकडून समाचार; छत्रपती शिवाजी महाराज कायम आदर्श राहतील

by nagesh
MNS | mns spokeperson gajanan kale on governor bhagat sigh koshyari statement about shivaji maharaj

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन   औरंगाबाद मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Kosyari) यांनी शिवाजी महाराजांवर भाष्य केले होते. शिवाजी आता जुने झाले आहेत. आता आपल्याकडे नवीन हिरो तयार झाले आहेत. त्यांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे राज्यपाल कोश्यारी म्हणाले होते. त्यावर मनसेने (MNS) नाराजी व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे. आम्हाला शिवाजी महाराज हे आदर्श होते आणि भविष्यात देखील ते आदर्श राहतील, असे मनसेचे (MNS) प्रवक्ते गजानन काळे (Gajanan Kale) म्हणाले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे जुन्या काळातील आदर्श असे म्हणत आपल्या राज्यपालांनी पुन्हा एकदा माती खाल्ली आहे. त्यांचा पुन्हा एकदा तोल गेला. ज्या विषयातील आपल्याला कळत नाही, त्या विषयाचे ज्ञान हे का पाजळत आहेत? राज्यपालांनी मागील एवढ्या घटना होऊनही सुधारायचे नाही, असे ठरवले आहे का? असा प्रश्न मनसेने उपस्थित केला. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा आदर्श ज्यांना घ्यायचा त्यांनी घ्यावा पण छत्रपती शिवरायांशी त्यांची तूलना करु नका. छत्रपती शिवाजी महाराज भूतकाळ, वर्तमान व भविष्यकाळात देखील आदर्श होते व राहतील. त्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे पार्सल या महाराष्ट्रातून परत पाठवण्याची वेळ आली आहे, असे यावेळी मनसेचे गजानन काळे म्हणाले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

राज्यपाल कोश्यारी यांनी यापूर्वी देखील महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्द्ल आक्षेपार्ह विधान केले होते.
तसेच त्यांनी मुंबईतून गुजराथी आणि मारवाडी लोक निघून गेल्यावर मुंबईचे (Mumbai) वैभव देखील निघून जाईल,
असे म्हणत देशाच्या आर्थिक राजधानी आणि मराठी माणसांच्या मातृभूमीचा अपमान केला होता.
त्यावर त्यांनी नंतर माफी देखील मागितली होती.
पण, दरवेळी ते अशी आक्षेपार्ह विधाने करुन नंतर माफी मागत असल्याने त्यांच्याबद्द्ल भाजपेत्तर पक्षांच्या मनात अडी निर्माण होत आहे.
आणि सर्व पक्षीय नेते राज्यपालांची उचलबांगडी करण्याची मागणी दरवेळी करत आहेत.

Web Title :- MNS | mns spokeperson gajanan kale on governor bhagat sigh koshyari statement about shivaji maharaj

हे देखील वाचा :

Pune Pimpri Crime | घराशेजारी राहणाऱ्या महिलेला अश्लील व्हिडीओ पाठवून विनयभंग, पिंपरी चिंचवड परिसरातील घटना

Anil Parab | साई रिसॉर्ट प्रकरणात अनिल परबांना अटकपूर्व जामीन मंजूर

Pune Crime | दोन पेट्रोलपंपावर दरोडा टाकणारी टोळी पुणे ग्रामीण पोलिसांकडून गजाआड

Chhagan Bhujbal | ‘राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे देशात परिवरर्तन होईल’ – छगन भुजबळ

Related Posts