IMPIMP

MNS on Ajit Pawar | ‘अजित पवार सुपारीबाज, तुमच्यासारखे टोप्या घालून राजकारण करत नाही’ – मनसे

by nagesh
MNS on Ajit Pawar | mns bala nandgaonkar criticized ajit pawar over criticism on raj thackeray

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन MNS on Ajit Pawar | औरंगाबादच्या सभेत बोलताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार (NCP Chif Sharad Pawar) यांच्यावर जातीयवादाचा आरोप केला. यानंतर मनसे (MNS) आणि राष्ट्रवादीत (NCP) राजकीय शीतयुद्ध रंगल्याचं दिसत आहे. राज ठाकरे यांना आम्ही सुपारी दिल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले होते. त्यानंतर आता मनसे नेते बाळा नांदगावकर (MNS Leader Bala Nandgaonkar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (MNS on Ajit Pawar)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

”अजित पवारांनी सुपारी दिली असं ते म्हणतात ते सुपारीबाज आहेत. शिवसेनेलाही (Shivsena) सुपारी दिलीय का? स्वत:चं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं पाहायचं वाकून ही अजित पवारांची प्रवृत्ती आहे. आमचा फायदा तुम्हाला झाला. तुम्ही काय दिले आम्हाला? आम्ही वैयक्तिक कामं घेऊन आलोय का?. जे चुकीचे आहे त्यावर राज ठाकरे भूमिका मांडतात. भोंगे सामाजिक विषय आहे धार्मिक नाही. तुमच्यासारखे टोप्या घालून आम्ही राजकारण करत नाही. प्रत्येकजण आपापले विचार मांडत असतो. तुम्ही ज्यांच्यासोबत सत्तेत आहात सगळ्यांचे विचार वेगळे आहेत मग काय टायमिंग पाहून विचार मांडता का?,” अशी टीका बाळा नांदगावकर यांनी केली. (MNS on Ajit Pawar)

पुढे बाळा नांदगावकर म्हणाले, ”कोण कोणाचं उपवस्त्र आहे हे सांगण्याची गरज नाही. ते सगळ्यांना माहिती आहे. आतापर्यंत आम्ही एकला चलो रे भूमिका मांडली आहे. सत्तेसाठी आम्ही तडजोडी करत नाही. विचारांवर आणि भूमिकांवर आम्ही ठाम आहे. राज्यामध्ये दंगली घडवण्याचा विषयच नाही. पोलिसांच्या आडून तुम्ही धुव्रीकरण केले जातेय. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) सकाळी 6 ते 10 पर्यंत भोंगे लावण्याची परवानगी द्यावी असं सांगितले आहे. परवानगी महिना-दोन महिन्याची असते का?,” असा प्रश्न बाळा नांदगावकर यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना विचारला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

दरम्यान, लोकसभेच्यावेळी आपली सुपारी घेतली होती. आता त्यांची सुपारी घेतली असं विधान अजित पवार यांनी केले. परंतु त्यानंतर लगेच सुपारी घेतली असं नाही तर आघाडी उमेदवारांच्या पाठिंब्यासाठी बोलत होते, मी माझे शब्द मागे घेतो, असं देखील अजित पवार यांनी म्हटलं होतं.

Web Title :- MNS on Ajit Pawar | mns bala nandgaonkar criticized ajit pawar over criticism on raj thackeray

हे देखील वाचा :

MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरेंकडून 12 अटींचे उल्लंघन, FIR मध्ये राज ठाकरे मुख्य आरोपी; ‘या’ कलमान्वये गुन्हा दाखल

Ajit Pawar | अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना सूचना, म्हणाले – ‘गाफिल न राहता कामाला लागा, निवडणुका घोषित होऊ शकतात’

MNS Chief Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल; राज्यात घडामोडींना वेग

Related Posts