IMPIMP

MNS on Sanjay Raut | ‘ईडीने थेट राष्ट्रवादीच्याच भोंग्यावर कारवाई केली’; मनसेचा संजय राऊतांना चिमटा

by nagesh
MNS on Sanjay Raut | the ed took direct action against the ncps bhonga mnss harsh criticism on sanjay raut

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन MNS on Sanjay Raut | शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांच्यावर सक्तवसुली
संचालनालयाने (ED) कारवाई केली आहे. या कारवाईमुळे राज्यात खळबळ उडाली. त्यानंतर संजय राऊत यांनी विरोधकांवर ताशेरे ओढले. अशातच
आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) संजय राऊत यांना चिमटा काढला आहे. (MNS on Sanjay Raut)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

या कारवाईसंदर्भात मनसेचे प्रमुख अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी ट्विटच्या माध्यमातून मत व्यक्त केलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) गुढी पाडव्याला केलेल्या भाषणातील मुद्दा जोडत खोपकर यांनी राऊतांची खिल्ली उडवली आहे. ”मशिदीच्या भोंग्यावर कारवाई करायला सांगितले होते. ईडीने थेट राष्ट्रवादीच्या भोंग्यावरच कारवाई केली,” अशी खोचक टीका अमेय खोपकर यांनी केली आहे. (MNS on Sanjay Raut)

तर राज ठाकरेंचे भाषण म्हणजे भाजपचा भोंगा असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. यानंतर मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनीही राऊत यांची खिल्ली उडवली. संजय राऊत हे शरद पवारांचा (Sharad Pawar) भोंगा वाजवत असल्याची टीका केली होती.

काय म्हणाले संजय राऊत ?
”माझे राहते घर व स्वकष्टाने मिळविलेल्या जमिनीवर ईडीने जप्तीची कारवाई केल्याने भाजपला उकळ्या फुटत असेल, अशा कारवाईला मी घाबरत नाही.
1 रूपया जरी अवैध असेल तर ती संपत्ती भाजपला दान करेल.
तसेच, महाराष्ट्रात सेनेसोबत भाजपची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करा अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशा धमक्या मला दिल्या.
महाराष्ट्रातही लवकरच कारवाईचे सत्र पाहायला मिळेल,” असं संजय राऊत म्हणाले होते.
यानंतर भाजपनेही (BJP) राऊतांवर हल्लाबोल केला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

नेमकं प्रकरण काय ?

प्रवीण राऊत (Praveen Raut) यांच्या नावे असलेल्या पालघर जिल्ह्यातील जमिनीसह संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) तसेच स्वप्ना पाटकर या दोघींच्या नावावरील अलिबागमधील किहिम बीच येथील 8 प्लॉटसह वर्षा राऊत यांच्या नावावरील दादर येथील फ्लॅटवर ईडीने टाच आणली.
राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर (Sujit Patkar) यांच्या स्वप्ना पाटकर (Swapna Patkar) पत्नी आहेत.
किहिम बीच येथील 8 प्लॉटच्या खरेदी व्यवहारात नोंदणी, इतर बाबींचे रोख व्यवहार झाले आहेत. यावर ईडीने कारवाई केली आहे.

Web Title :- MNS on Sanjay Raut | the ed took direct action against the ncps bhonga mnss harsh criticism on sanjay raut

हे देखील वाचा :

Anil Kumble-Virat Kohli | ‘…म्हणून विराट कोहलीला कुंबळे प्रशिक्षक म्हणून नको होते’; तब्बल 5 वर्षांनी समोर आलं खरं कारण

Health Care Tips For Night Shift Workers | रात्रपाळीत काम केल्यास आरोग्याबाबत सतर्क राहा, ‘या’ गोष्टींची विशेष काळजी घ्या अन्यथा आजारी पडाल

Fineotex Chemical Stock | 15 रुपयांवरून 190 वर पोहचला स्टॉक, ‘या’ दिग्गज इन्व्हेस्टरने लावला आहे मोठा डाव

Related Posts