IMPIMP

MNS On Sharad Pawar | शरद पवारांना मनसेचे प्रत्युत्तर, मौका सभी को मिलता है, आज बोटं मोजताय, उद्या…

by nagesh
MNS On Sharad Pawar | mns raju patil replied ncp chief sharad pawar criticism over raj thackeray

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन MNS On Sharad Pawar | महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी-शिवसेना नेत्यांमध्ये (NCP-Shivsena
Leader) सध्या चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे (MNS Leader Sandeep Deshpande) यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीवर
टीका केली होती. शिवसेना ही शरद पवारांच्या प्राणीसंग्रहालयातील मांजर आहे (Maharashtra Politics), असे त्यांनी म्हटले होते. त्यावर खुद्द शरद
पवार यांनी अतिशय मोजक्या शब्दात मनसेचा समाचार घेताना म्हटले होते की, प्राणी वगैरेसंदर्भातील उल्लेख मी काही करणार नाही. साधारणपणे हाताच्या बोटावर मोजता येतील इतके सुद्धा ज्यांना विधीमंडळात आमदार निवडून आणता येत नाहीत त्यांच्याबद्दल काय भाष्य करायचे. (MNS On Sharad Pawar)

शरद पवार यांनी मनसेवर केलेल्या टीकेला आता मनसे आमदार राजू पाटील (MNS MLA Raju Patil) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राजू पाटील यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आज बोटं मोजताय, उद्या बोटं मोडाल आणि परवा….बोटं तोंडात घालाल. आम्ही ’धन’से कमी आहोत, पण ’मनसे’ लई आहोत. आदर देतोय, आदर घ्या. या ट्विटसाठी राजू पाटील यांनी ‘मौका सभी को मिलता है’, असा हॅशटॅग दिला आहे. (MNS On Sharad Pawar)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

राज ठाकरे (Raj Thackeray) सध्या पक्ष बांधणीसाठी विदर्भाच्या दौर्‍यावर आहेत. याबाबत राज ठाकरे यांचा चंद्रपूर दौरा आणि चित्ते भारतात येणे, यावर एक प्रश्न शरद पवार यांना विचारला होता. त्यावर शरद पवार यांनी मी लोकांच्या प्रश्नांवर लक्ष देतो. या असल्या गोष्टीत फारसे बघत नाही, असे म्हणून एकूणच राज ठाकरे यांचा दौरा आणि आणि पंतप्रधान मोदींच्या (PM Modi) हस्ते भारतात आणण्यात आलेल्या चित्त्यांच्या कार्यक्रमाला महत्व दिले नव्हते.

Web Title :- MNS On Sharad Pawar | mns raju patil replied ncp chief sharad pawar criticism over raj thackeray

हे देखील वाचा :

Narayan Rane | सत्तेचं दूध पाजलं म्हणणाऱ्यांनी सत्तेत खोक्याच्या रुपात तूप खाल्लं, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार (व्हिडिओ)

Narayan Rane On Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंच्यामागे ईडी लागणार; नारायण राणे यांनी थेट दिला इशारा, आत जाल…

Chandrashekhar Bawankule | उद्धव ठाकरेंना आपल्या परिवाराशिवाय कोणीच दिसत नाही, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

Gautam Adani Meets Uddhav Thackeray | गौतम आदानी-उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Related Posts