IMPIMP

MNS On Thackeray Government | ‘गुवाहटीत असली, ‘वर्षा’वर नकली अन् सेक्युलर गॅसवर’; मनसेचा जोरदार हल्लाबोल

by nagesh
MNS On Thackeray Government | In Guwahati more than 33 shivsena mla on Varsha only few mla, secular on gas MNS's strong attack on shivsena as well as thackeray government

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – MNS On Thackeray Government | नगरविकास मंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह सर्व बंडखोर आमदार आता गुवाहटी (Guwahati) येथे दाखल झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा धक्का मानला जात आहे. कारण आघाडी सरकार सध्या धोक्यात असल्याची मोठी चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप (BJP) आणि मनसेकडून (MNS) प्रतिक्रिया दिली जात आहे. मात्र वेट अन्ड वाॅचची भूमिका भाजपने घेतली आहे. अशातच मनसे आता शिवसेनेवर (MNS On Thackeray Government) हल्लाबोल करताना दिसत आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

मंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना उद्देशून कोणाचेही नाव न घेता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे (MNS Leader Sandeep Deshpande) यांनी ट्वीट केलं आहे. त्यामध्ये ते म्हणाले की, “असली गुवाहटीत आणि नकली ‘वर्षा’वर आणि सेक्युलर गॅसवर,” असे म्हणत गुवाहटीत असलेले एकनाथ शिंदे हेच खरे शिवसैनिक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यावरुन शिवसेनेसह राष्ट्रवादी (NCP) अन् काँग्रेसवर (Congress) देखील संदीप देशपांडे यांनी निशाणा साधला आहे. (MNS On Thackeray Government)

शिवसेनेचे बंडखोर आमदार गुवाहटीत –

महाविकास आघाडी सरकावर विरोधात बंडाचं निशाण फडकावणारे एकनाथ शिंदे यांनी यावेळी मोठा दावा केला आहे. “माझ्यासोबत केवळ 35 नाही, तर 40 शिवसेना आमदारांचा पाठिंबा आहे. याशिवाय आणखी 10 आमदार सोबत येणार आहेत”, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर आमदार आता आसाममधील गुवाहटी येथे दाखल झाले आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- MNS On Thackeray Government | In Guwahati more than 33 shivsena mla on Varsha only few mla, secular on gas MNS’s strong attack on shivsena as well as thackeray government

हे देखील वाचा :

Maharashtra Political Crisis | उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार ?, शिवसेना नेते संजय राऊत यांचं खळबळजनक ट्विट; म्हणाले…

Maharashtra Political Crisis | ’36 आमदार सोबत, त्यापैकी शिवसेनेचे 33 आणि अपक्ष 3, एकूण संख्याबळ 50 पर्यंत जाईल’; बच्चू कडूंचा मोठा दावा

Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदेंचा मोठा दावा; म्हणाले – ’35 नव्हे 40 आमदार माझ्यासोबत, आणखी 10 येतील”

Related Posts