IMPIMP

Mobile Earphone Side Effects | ईयरफोन वापर करत असाल तर व्हा सावध ! ‘इतके’ तास ऐकली गाणी तर ‘निकामी’ होतील कानांच्या नसा !

by bali123
Mobile Earphone Side Effects | bad effects of using earphones for your health mobile earphone side effect causes cancer and heart problems

नवी दिल्ली – वृत्तसंस्था – Mobile Earphone Side Effects | तुम्ही ईयरफोन यूज करता का ? अनेक तरूण तुम्ही पाहिले असतील जे ईयरफोन घालून बसलेले असतात. ईयरफोन यूज करणे चूक नाही, परंतु सतत तासानतास त्याचा वापर करणे खुप धोकादायक ठरू शकते. ईयरफोनमुळे मागील काही वर्षात कान खराब होण्याची प्रकरणे आणि रस्ते अपघात वाढले आहेत. हा प्रकार एक गंभीर समस्या म्हणून समोर आला आहे. (Mobile Earphone Side Effects)

50 टक्के तरूणांमध्ये कानाच्या समस्येचे कारण ईयरफोनचा सतत वापर करणे आहे. ईयरफोन सतत वापरल्याने कानात वेदना, डोकेदुखी, निद्रानाश इत्यादी समस्या होतात. ईयर स्पेशलिस्ट डॉ. ए. वहाब यांनी म्हटले की, ईयरफोन सतत वापरल्याने ऐकण्याची क्षमता 40 डेसीबल पर्यंत कमी होते. (Mobile Earphone Side Effects)

काय सांगतात एक्सपर्ट

सतत ईयरफोन वापरल्याने कानाचे पडदे व्हायब्रेट होतात आणि ते खराब होण्याची शक्यता असते.
कानात छन-छन आवाज येणे, चक्कर येणे यामुळे होणार्‍या समस्या आहेत.
विशेषता दूरचा आवाज ऐकण्यास त्रास होतो.
यामुळे बहिरेपणा येऊ शकतो.
आरोग्यावर ईयरफोनचा व्हॉल्यूम आणि गाणी ऐकण्याचा कालावधी याचा परिणाम होतो.
मोठ्या आवाजात गाणी ऐकणे अतिशय धोकादायक आहे. यामुळे आजूबाजूचे आवाज ऐकू येत नाहीत. अपघात होऊ शकतो.

होतात हे गंभीर परिणाम

मोठ्या आवाजात संगीत ऐकल्याने मानसिक समस्या होतात.
हृदयरोग आणि कॅन्सरची शक्यता वाढते.
ईयरफोनचा आवाज 100 डीबी असेल तर कान डॅमेज होतात. कान 65 डेसिबल आवाज सहन करू शकतात.
85 डेसिबलपेक्षा जास्त आवाज कानांसाठी धोका आहे.
ईयरफोनवर जर 40 तासापेक्षा जास्त 90 डेसिबलचा ध्वनी ऐकला तर कानाच्या नसा पूर्णपणे डेड होतात.

हे लक्षात ठेवा

ईयरफोनचा वापर खुपच आवश्यक असेल आणि जास्त काळ करायचा असेल तर मध्ये एक तासानंतर किमान 5 मिनिटांचा ब्रेक घ्या.
ईयरबडच्या तुलनेत ईयरफोनचा वापर चांगला आहे कारण ते कानाच्या बाहेर लावले जातात. चांगल्या कंपनीचे ईयरफोन वापरा.

Web Title : Mobile Earphone Side Effects | bad effects of using earphones for your health mobile earphone side effect causes cancer and heart problems

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

हे देखील वाचा :

Related Posts