IMPIMP

Modi Government | शेतकर्‍यांचे वाढणार उत्पन्न ! मोदी सरकारने इथेनॉलच्या किमतीत 2.55 रुपये प्रती लीटर पर्यंत केली वाढ

by nagesh
Modi Government | Modi government cabinet decision will increase income of farmers as ethanol prices increased by up to rs 2 .55 per liter check details

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Modi Government | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आर्थिक प्रकरणांवर केंद्रीय समितीने (CCEA) शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने (Modi Government) ऊस उत्पादक शेतकर्‍यांना (Sugarcane Farmers) थेट लाभ देण्यासाठी इथेनॉलच्या किमतीत 80 पैशापासून 2.55 रुपये प्रति लीटरपर्यंत वाढ (Ethanol Price Hike) केली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

यातून ऊस आधारित इथेनॉलचे दर 62.65 रुपयांवरून वाढून 63.45 रुपये प्रति लीटर होतील. केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकुर (Anurag Singh Thakur) यांनी सांगितले की, इथेनॉलच्या नवीन किमती 1 डिसेंबर 2021 पासून लागू होतील.

श्रेणीनुसार इथेनॉलची काय असेल नवीन किंमत?

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर (union minister anurag thakur) यांनी सांगितले की, बी श्रेणीच्या इथेनॉलचा दर 2.55 रुपयांनी वाढवून 59.08 रुपये प्रति लीटर केला आहे, जे सध्या 57.61 रुपये प्रति लीटर आहे.

तसेच, सी श्रेणीच्या इथेनॉलचा दर 44.54 रुपयावरून 2.12 रुपये वाढवून 46.66 रुपये प्रति लीटर केला आहे. यापूर्वी केंद्र सरकारने ऑक्टोबर 2020 मध्ये ऊसातून काढल्या जाणार्‍या इथेनॉलमध्ये 3.34 रुपये प्रति लीटरची वाढ केली होती.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

’12 राज्यांच्या शेतकर्‍यांना होईल थेट फायदा’

अनुराग ठाकुर यांनी म्हटले की, इथेनॉलच्या किमतीत करण्यात आलेल्या वाढीने देशातील 12 राज्यांतील शेतकर्‍यांना थेट फायदा मिळेल.
त्यांनी सांगितले की, उसाच्या लगद्यापासून बनणार्‍या इथेनॉलचा
दर डिसेंबर 2020 पासून सुरू झालेल्या पुरवठा वर्षादरम्यान (Supply Year) च्या 59.48 रुपये प्रति लीटरवरून वाढून
आता 62.65 रुपये प्रति लीटर करण्यात आला आहे. (Modi Government)

तेल आयात कमी करणार

मोदी सरकारने (Modi Government) तेल आयात (Crude Oil Import) कमी करण्यासाठी योजना बनवली आहे.
या अंतर्गत वाहन इंधनात इथेनॉलच्या मिश्रणाला (Ethanol Blending) प्रोत्साहन दिले जात आहे.
या अंतर्गत सरकारने 10 टक्के इथेनॉलच्या मिश्रणाला मंजूरी दिली आहे.

इथेनॉल ब्लेंडिंग पेट्रोल प्रोग्राम लागू

केंद्र सरकारने म्हटले की, इथेनॉलच्या किमतीत वाढ केल्याने ऊस उत्पादक शेतकर्‍यांना आपल्या पिकाचा चांगला भाव मिळेल. सरकार 10 टक्के इथेनॉल मिश्रण असलेल्या पेट्रोलची विक्री होत असलेल्या परिसरात इथेनॉल ब्लेंडिंग पेट्रोल प्रोग्राम (EBP Programme) लागू करत आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

20 टक्के इथेनॉल ब्लेंडिंगवर काम सुरू

सरकारने 1 एप्रिल 2019 पासून हा प्रोग्राम संपूर्ण देशात लागू केला आहे.
मात्र, सध्या अंदमान-निकोबार आणि लक्षद्वीपमध्ये हा कार्यक्रम लागू करण्यात आलेला नाही.
सरकार जून 2021 पासून 20 टक्के इथेनॉल ब्लेंडिंगच्या योजनेवर काम करत आहे.
जी एप्रिल 2025 पासून लागू करण्याचे लक्ष्य आहे.

Web Title :- Modi Government | Modi government cabinet decision will increase income of farmers as ethanol prices increased by up to rs 2 .55 per liter check details

हे देखील वाचा :

Indian Railways | राज्यातील मुखेड, नांदेड, पुर्णा, वसमत, हिंगोली, वाशिम, अकोला आणि मलकापुरमधून धावणार ‘ही’ नवी सुपरफास्ट रेल्वे

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 48 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Chandrakant Patil | ‘एसटी कर्मचाऱ्यांचा एल्गार हे ‘महाविकास’च्या महाभकास धोरणांचेच अपयश’ – चंद्रकांत पाटील

Related Posts