IMPIMP

Modi Government | मोदी सरकारने 6.5 कोटी लोकांच्या अकाऊंटमध्ये पाठवली दिवाळीची भेट, तात्काळ ‘या’ पद्धतीने जाणून घ्या शिल्लक

by nagesh
7th Pay Commission | 7th pay commission huge increase in the basic salary of government employees due to the fitment factor

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Modi Government | मोदी सरकारने 6.5 कोटी लोकांच्या खात्यात दिवाळीची भेट ट्रान्सफर केली आहे. EPFO प्रॉव्हिडंट फंड (PF) सबस्क्रायबरच्या खात्यात व्याजाचे पैसे (PF interest) ट्रान्सफर केले आहेत. तुम्ही सुद्धा तुमचे पीएफ अकाऊंट चेक करून जाणून घ्या की तुमच्या PF खात्यात मोदी सरकारकडून (Modi Government) दिवाळीची भेट आली आहे किंवा नाही. तुम्ही 4 पद्धतींचा वापर करून आपले खाते चेक करू शकता. या 4 पद्धत कोणत्या ते जाणून घेवूयात…

1. SMS द्वारे बॅलन्स चेक करा

तुम्ही एसएमएसने सुद्धा आपला पीएफ अकाऊंटचा बॅलन्स सहज जाणून घेवू शकता. यासाठी तुम्हाला तुमचा युएएन माहित असायला हवा. सोबतच तो अ‍ॅक्टिव्ह असावा. एसएमएस सर्वप्रथम EPFOHO UAN HIN टाइप करून 7738299899 वर पाठवावा लागेल. ज्यानंतर तुम्हाला हिंदीमध्ये मॅसेज येईल. ज्यामध्ये तुमच्या पीएफ अकाऊंटमध्ये जमा रक्कमेची पूर्ण माहिती असेल. (Modi Government)

2. मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या बॅलन्स

रजिस्टर्ड मोबाइल नंबरपासून 011 22901406 वर मिस्ड कॉल द्या. यानंतर ईपीएफओकडून एक संदेश मिळेल, ज्यामध्ये तुमच्या पीएफ खात्याची डिटेल मिळेल. यासाठी युएएनसोबत बँक अकाऊंट, पॅन आणि आधार लिंक्ड असावे.

3. वेबसाइटच्या माध्यमातून चेक करा बॅलन्स

यासाठी https://passbook.epfindia.gov.in/MemberPassBook/Login वर लॉग-इन करा. आता युएएन आणि पासवर्ड द्वारे लॉग-इन करा. यानंतर डाऊनलोड व्ह्यू पासबुकच्या ऑपशनवर क्लिक करा.

4. उमंग अ‍ॅपद्वारे (umang app) ईपीएफ बॅलन्स चेक करा

प्ले स्टोरवरून उमंग अ‍ॅप डाऊनलोड करा. या अ‍ॅपवर अनेक सरकारी सेवा उपलब्ध आहेत. यामध्ये ईपीएफओ ऑपशन निवडल्यानंतर एम्प्लॉई सेंट्रीक सर्व्हीस निवडा. आता युएएन नंबर टाका. यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी प्राप्त होईल. तुम्ही व्ह्यू पासबूक अंतर्गत EPF बॅलन्स चेक करू शकता.

Web Title : Modi Government | modi government gives diwali gift to more than 6 crore people check your pf account balance fast

हे देखील वाचा :

PM KISAN | पती-पत्नी दोघेही घेऊ शकतात का पीएम किसान योजनेतून वार्षिक 6,000 रुपये? जाणून घ्या नवीन नियम

Ajit Pawar | ‘आज गडी लय जोरात हाय… जास्त बोलत नाही’; अजित पवारांकडून राजेंद्र पवार यांना ‘कोपरखळी’

Cryptocurrency | ‘या’ 6 नाण्यांनी गुंतवणुकदारांना केले मालामाल, एका दिवसात झाला 2,340.75% पर्यंतचा फायदा

Related Posts