IMPIMP

Modi Government | मोदी सरकारने 24 कोटी लोकांच्या अकाऊंटमध्ये जमा केली ‘एवढी’ रक्कम; ‘इथं’ तपास

by nagesh
Modi Government | pm modi govt epfo send pf interest in more than 24 crore people bank account check details

नवी दिल्ली : वृत्त संस्थामोदी सरकारने (Modi Government) गेल्या महिन्यात डिसेंबरमध्ये 24.07 कोटी लोकांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले आहेत. EPFO ने आतापर्यंत 24.07 कोटी लोकांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले आहेत. EPFO ने अधिकृत ट्विटर हँडलवर सांगितले की, आतापर्यंत त्यांनी 24.07 कोटी लोकांच्या खात्यात 2020-21 या आर्थिक वर्षात 8.50 टक्के दराने PF व्याजाचे पैसे पाठवले आहेत. तुमच्या खात्यात पैसे आले आहेत की नाही, हे तुम्ही तपासले का? (Modi Government)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

इतके आले व्याजाचे पैसे
विशेष म्हणजे 2020-21 या आर्थिक वर्षासाठी पीएफवर 8.5 टक्के व्याज हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावाला सरकारने यापूर्वीच हिरवा झेंडा दाखवला होता. या निर्णयाला कामगार मंत्रालयानेही संमती दिली होती. आता EPFO ग्राहकांच्या खात्यात 8.5 टक्के व्याज जमा करत आहे.

देशातील सुमारे 6.5 कोटी ग्राहकांच्या खात्यात पैसे येऊ लागले आहेत. अशा स्थितीत, सर्व खातेदार त्यांच्या खात्यात किती पीएफ व्याजाचे पैसे आले हे पाहण्यासाठी त्यांचे पीएफ खाते तपासत आहेत. (Modi Government)

अशा प्रकारे जाणून घ्या PF बॅलन्स

SMS द्वारे :
ईपीएफओकडे नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून 7738299899 वर EPFO UAN LAN (भाषा) पाठवा. LAN म्हणजे तुमची भाषा. इंग्रजीत माहिती हवी असल्यास LAN ऐवजी ENG लिहावे लागेल. त्याचप्रमाणे हिंदीसाठी HIN आणि तमिळसाठी TAM. हिंदीमध्ये माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला EPFOHO UAN HIN लिहून मेसेज करावा लागेल.

मिस कॉलद्वारे :
तुम्ही मिस्ड कॉलद्वारे तुमची ईपीएफ शिल्लक जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 011-22901406 वर मिस्ड कॉल करावा लागेल.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

वेबसाइट द्वारे :
तुमची शिल्लक ऑनलाइन तपासण्यासाठी, EPF पासबुक पोर्टलला भेट द्या. तुमचा UAN आणि पासवर्ड वापरून या पोर्टलवर लॉग इन करा. यामध्ये, Download/View Passbook वर क्लिक करा आणि त्यानंतर तुमच्यासमोर पासबुक उघडेल ज्यामध्ये तुम्ही शिल्लक पाहू शकता.

उमंग अ‍ॅपद्वारे :
जर तुमच्याकडे स्मार्टफोन असेल तर तुम्ही जेव्हा हवे तेव्हा अ‍ॅपद्वारे तुमची ईपीएफ शिल्लक तपासू शकता.
यासाठी UMANG APP ओपन करा आणि ईपीएफओवर क्लिक करा.
यामध्ये Employee Centric Services वर क्लिक करा आणि त्यानंतर View Passbook वर क्लिक करा आणि UAN आणि पासवर्ड टाका.
नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर OTP येईल. तो प्रविष्ट केल्यानंतर, आपण EPF शिल्लक पाहू शकता.

Web Title : Modi Government | pm modi govt epfo send pf interest in more than 24 crore people bank account check details

हे देखील वाचा :

Pune Corporation | पुण्यातील धनकवडी ‘ट्रक टर्मिनन्स’च्या जागेवर उभारणार ‘ट्वीन टॉवर्स’ ! पालिकेच्या जागा सेवा आणि व्यावसायिक कारणांसाठी वापरण्याचे ‘प्लॅनिंग’

Gold Silver Price Today | सोन्याच्या दरात पुन्हा वाढ, चांदीचे भावही वधारले; जाणून घ्या नवीन दर

SSC HSC Exam 2022 | 10 वी-12 वीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार; शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

Related Posts