IMPIMP

Mohit Kamboj | ‘श्री उद्धव ठाकरे जी और श्री शरद पवार साहब मैं आप दोनो से…’; महापालिकेच्या नोटीसनंतर मोहित कंबोज आक्रमक

by nagesh
Mohit Kamboj-Rohit Pawar | BJP leader mohit kamboj allegations on rohit pawar baramati agro limited in tweet

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन राज्यात सध्या ईडीचं (ED) धाडसत्र चालू आहे. तर दुसरीकडे मुंबई महापालिका Brihanmumbai Municipal Corporation (BMC) भाजप नेत्यांना नोटीस (BMC Send Notice To BJP Leaders) पाठवत आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय संघर्ष विकोपाला गेला आहे. अशातच भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांना मुंबई महापालिकेने नोटीस पाठवली आहे. त्यामुळे कंबोज (Mohit Kamboj) आक्रमक झाले असून त्यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांनाही मी घाबरत नाही. माझं जे काही करायचं ते करा. खोट्या नोटिशी आणि केसेसे करायच्या असतील तर तेही करा, माझा महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) विरोधातील संघर्ष सुरू राहणार आहे, असं मोहित कंबोज यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात कंबोज (Mohit Kamboj) यांनी ट्विट केलं आहे.

मोहित कंबोज यांच्या घरी आज महापालिकेचं पथक जाणार आहेत. पथक जाण्याअगोदर त्यांनी हे ट्विट केलं होतं. कंबोज यांच्या सांताक्रूझ (Santa Cruz) पश्चिमेतील खुशी प्राइड बेलमोंडो (Khushi Pride Belmondo) इमारतीतील घरात बेकायदा बांधकाम झालं आहे की नाही याची तपासणी करण्यासाठी त्यांनी नोटीस पाठवण्यात आली होती.

दरम्यान, या नोटीसनुसार महापालिका पथक 23 मार्च किंवा त्यानंतर कंबोज यांच्या घरात पाहणीसाठी येणार आहे.
त्यामुळे आता पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Web Title :- Mohit Kamboj | bjp leader mohit kamboj tweet on bmc notice Shri Uddhav Thackeray ji and Shri Sharad Pawar sahib, I am not afraid of both of you, do whatever I want to do!

हे देखील वाचा :

Sanjay Raut | संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले – “यांची हाडं राजकीय स्मशानात रचली गेली आहेत, त्यांना कायमचं…”

Narayan Rane | ED च्या कारवाईनंतर नारायण राणे यांचा CM उद्धव ठाकरेंना इशारा; म्हणाले – ‘आगे आगे देखिए होता है क्‍या’

Crime News | ‘चॉकलेट’ खाल्ल्याने एकाचवेळी चार मुलांचा तडफडून मृत्यू

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीचा भाव किती? जाणून घ्या लेटेस्ट दर

Related Posts