IMPIMP

Monsoon Session | उद्धव ठाकरेंची खेळी ! पावसाळी अधिवेशनात शिंदे गटाच्या आमदारांना व्हिप जारी

by nagesh
Maharashtra Karnataka Border Dispute | uddhav thackeray declare karnataka occupied maharashtra union territory till court decision uddhav thackeray demand in legislative council

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन खरी शिवसेना (Shivsena) कोणाची ? पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची (Party Chief Uddhav Thackeray) की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची. याबाबत सुप्रीम कोर्ट (Supreme Court), निवडणूक आयोगाकडे (Election Commission) प्रकरण प्रलंबित असताना आता उद्यापासून पावसाळी अधिवेशनाला (Monsoon Session) सुरुवात होत आहे. पावसाळी अधिवेशनाच्या (Monsoon Session) पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी आणखी एक खेळी केली आहे. विधानसभेतील (Legislative Assembly) शिवसेनेच्या 55 आमदारांना ठाकरेंनी व्हिप (Whip) जारी केला आहे. त्यामुळे शिंदे गटातील आमदारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांनी शिवसेनेच्या आमदारांना (MLA) व्हिप जारी केला आहे. पावसाळी अधिवेशनानिमित्त (Monsoon Session) विविध शासकीय ठराव, प्रस्ताव सभागृहात आणले जाणार आहेत. अशावेळी मतदानाची संभावना असते. तेव्हा विधानसभेतील कामकाज संपेपर्यंत सभागृहात उपस्थित राहण्याबाबत आमदारांना व्हिप जारी केला आहे. एकीकडे विधानसभेत एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून भरत गोगावले (Bharat Gogawle) यांना मुख्य प्रतोद नेमले आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस (Congress) पक्षाने आपल्या आमदारांना देखील व्हिप जारी केला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

शिवसेना आमचीच – शंभूराज देसाई

आम्ही मूळ शिवसेना आहोत. विधानसभेत, लोकसभेत आम्ही बहुमतात आहोत.
सर्वोच्च न्यायालय जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य असेल. आमची बाजू भक्कम आहे.
आम्ही सुप्रीम कोर्टात आणि निवडणूक आयोगाकडे आमची बाजू भक्कमपणे मांडली आहे.
यामुळे आम्हाला कोठेही अडचण नाही, असा विश्वास शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी व्यक्त केला.

Web Title : – Monsoon Session | shivsena chief uddhav thackeray mla sunil prabhu issues whip to all shivsena mlas including shinde group too monsoon session

हे देखील वाचा :

Pune Pimpri Crime | पिंपरीत Bitcoin मध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने 14 लाखांची फसवणूक

Rakesh Jhunjhunwala | राकेश झुनझुनवाला यांच्या निधनाचा पोर्टफोलिओवर परिणाम, खुले होताच कोसळले ‘हे’ स्टॉक्स

Bank Jobs 2022 | बँकांमध्ये 6000 पेक्षा जास्त पदांसाठी भरती, लवकर करा अर्ज; ‘ही’ आहे शेवटची तारीख

Related Posts