IMPIMP

Monsoon Updates | गुडन्यूज! मान्सूनचे अंदमानमध्ये आगमन, ‘या’ तारखेला येणार महाराष्ट्रात

by sachinsitapure

पुणे : Monsoon Updates | मान्सूनचे काल १९ मे रोजी अंदमानमध्ये आगमन झाले आहे. ३१ मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होऊ शकतो. तर महाराष्ट्रात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सून येऊ शकतो. भारतीय हवामान विभागाने (IMD) १९ मे रोजी अंदमानमध्ये मान्सून दाखल होईल तसेच यंदा मान्सून अंदमान निकोबार बेटांमध्ये वेळेआधी येणार, असे हवामान विभागाने म्हटले होते. हा अंदाज खरा ठरला आहे.

मान्सूनच्या आगमनाची ही वार्ता सर्वसामान्यांना सुखावणारी आहेच, तर शेतकरी वर्गाला देखील आनंददायक आहे. लवकरच बळीराजाची धावपळ सर्वत्र सुरूहोणार आहे.

मान्सून काल अंदमान, मालदीव, कोमोरिनच्या काही भागात दाखल झाला आहे. तसेच बंगालच्या उपसागराच्या काही भागात मान्सून पोहचला आहे. मान्सून दाखल झाल्यामुळे अंदमानमध्ये पाऊस सुरु झाला आहे, याबाबतची माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी एक्सवर पोस्ट करून दिले आहे.

दरवर्षी २२ मे पर्यंत मान्सून अंदमानमध्ये दाखल होतो. यंदा तो तीन दिवस आधीच आला आहे. लवकरच मान्सूनची वाटचाल केरळकडे सुरु होईल. दहा दिवसात अंदमानमधून नैऋत्य मोसमी वारे केरळपर्यंत पोहचतात. मान्सूनची वाटचाल अशीच राहिली तर ३१ मे पर्यंत केरळमध्ये तो दाखल होईल.

Sinhagad Road Pune Crime News | पुणे : वाहन कर्जासाठी बोगस कागदपत्रे देऊन बँकेची 17 लाखाची फसवणूक

Related Posts