IMPIMP

Monthly Income Scheme | बँकेपेक्षा जास्त मिळेल व्याज, पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत 1000 रुपये करा जमा

by nagesh
Post Office MIS Calculator | post office scheme deposit 2 lakh lumpsum in post office monthly income scheme and get guaranteed 13200 rupees per year income check details

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Monthly Income Scheme | पैसे सुरक्षित राहावे आणि त्यावर व्याज सुद्धा बँकेच्या तुलने जास्त मिळावे असे वाटत असेल तर पोस्ट ऑफिसच्या (Post Office) या योजनेचा (POMIS) लाभ घेऊ शकता. भारतात पोस्ट ऑफिससोबत गुंतवणुकदारांचे एक विश्वासाचे नाते आहे. पोस्टात अनेक योजना आहेत ज्यामध्ये बँकेच्या तुलनेत जास्त रिटर्न मिळतो. (Monthly Income Scheme)

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

पोस्ट ऑफिस मध्ये Post Office Monthly Income Scheme एक चांगली योजना आहे. या योजनेचे अनेक लाभ आहेत. या योजनेत गुंतवणुकीनंतर दर महिना एक फिक्स्ड इन्कम (Fixed Income) होईल, आणि तुमचे पैसे सुद्धा पूर्णपणे सुरक्षित राहतील.

किमान 1000 रुपयांनी करा गुंतवणूक
जर तुम्हाला 5 वर्षासाठी गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी पोस्ट ऑफिसच्या मंथली सेव्हिंग स्कीम एक चांगला पर्याय आहे. पोस्ट ऑफिसच्या मंथली सेव्हिंग स्कीममध्ये (MIS) तुम्ही सिंगल अकाऊंटद्वारे किमान 1,000 रुपये आणि कमाल 4.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता.

जॉईंट खात्यात (Joint Account) कमाल पैशांची मर्यादा 9 लाख रुपयांपर्यंत आहे. म्हणजे पती-पत्नी दोघे मिळून जॉईंट खात्यात 9 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात. ही योजना निवृत्त कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी खुप लाभदायक आहे. (Monthly Income Scheme)

अल्पवयीनांच्या नावावर सुद्धा योजनेत डिपॉझिट करू शकता. परंतु अशा खात्यात 3 लाख रुपयांपर्यंत गुंतवणुक करता येऊ शकते. या योजनेत डिपॉझिट (Deposit) साठी पोस्ट ऑफिसमध्ये एक वेगळा POMIS फॉर्म भरावा लागतो. गुंतवणुकीपूर्वी ग्राहकाला पोस्ट ऑफिसमध्ये एक बचत खाते उघडावे लागते.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत (POMIS) सध्या 6.6 टक्के वार्षिक व्याज मिळते, जे इतर फिक्स्ड डिपॉझिट (Fixed Deposit) पेक्षा चांगले आहे. POMIS चा फॉर्म भरताना ओळखपत्र, रहिवाशी दाखला, 2 पासपोर्ट साईज फोटोंची आवश्यकता असेल. एका नॉमिनीची आवश्यकता असते.

योजनेचा कालावधी
पोस्ट ऑफिस (Post Office) च्या या योजनेचा मॅच्युअर होण्याचा कालावधी 5 वर्ष आहे.
जर वेळेपूर्वी पैसे काढले तर नुकसान होऊ शकते. एक वर्षाच्या आत पैसे काढण्याची तरतूद नाही.
3 वर्षाअगोदर पैसे काढल्यास 2 टक्के पेनल्टी द्यावी लागते. 3 वर्ष ते 5 वर्षादरम्यान पैसे काढल्यास 1 टक्के रक्कम कापली जाते.

या अकाऊंटचे फायदे
हे अकाऊंट (Account) एकातून दुसर्‍या पोस्ट ऑफिसमध्ये शिफ्ट करू शकता.
मॅच्युरिटीची 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर रक्कम पुन्हा गुंतवू शकता. यामध्ये नॉमिनी नियुक्त करता येतो,
जेणेकरून काही आकस्मिक घडल्यास नॉमिनीला रक्कम मिळते.
एमआयएस (MIS) योजनेत टीडीएस (TDS) कापला जात नाही, परंतु व्याजावर टॅक्स द्यावा लागतो.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

Web Title :- Monthly Income Scheme | monthly income scheme post office pomis rate interest

हे देखील वाचा :

CM Uddhav Thackeray | नवीन वर्षात नवं संकट ! कोरोनाची तिसरी लाट? – CM उद्धव ठाकरेंनी दिले ‘हे’ निर्देश

Ramdas Athawale | ‘उद्धव ठाकरेंना बरं होण्यास 2-3 महिने लागतील, मुख्यमंत्र्याचा पदभार देवेंद्र फडणवीसांना द्यावा’ – रामदास आठवले

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 80 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Related Posts