IMPIMP

MP : ‘वय झालं की मरावच लागतं’; कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांबाबत मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य

by Team Deccan Express
mp minister prem singh patel controversial comment corona deaths

भोपाळ : देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. मध्य प्रदेशातही कोरोना परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाताना दिसत आहे. इथे कोरोनामुळे शेकडो लोकांचा मृत्यू होत आहे. त्याबाबत बोलताना पशूपालनमंत्री प्रेमसिंह पटेल prem singh patel यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ‘लोकांचे वय झाले की मरावेच लागते’, असे प्रेमसिंह पटेल यांनी सांगितले.

चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना थेट इशारा, म्हणाले – ‘मला चंपा बोलणं थांबवा, अन्यथा…’

मध्य प्रदेशात गेल्या 24 तासांत 9 हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित समोर आले आहेत. तर कोरोनामुळे 51 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली जात आहे. मध्य प्रदेशात कोरोना व्हायरसची लागण होऊन मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या सर्व परिस्थितीबाबत प्रेमसिंह prem singh patel यांना विचारले असता त्यांनी म्हटले, की जे मृत्यू झाले आहेत, ते कोणीही थांबवू शकत नाही. डॉक्‍टर्सची व्यवस्था करण्यात आली आहे. लोकांनी डॉक्टरांकडे जायला हवे. मृतांच्या संख्येबाबत सांगायचे तर लोकांना आपले वय पूर्ण झाले, की मरावेच लागते.

‘अजित पवार सत्तेसाठी हपापलेले, जास्त गमजा मारू नका, कालचक्र फिरत असतं’; चंद्रकांत पाटलांचा टोला

दरम्यान, कोरोनामुळे होत असलेल्या मृतांचे आकडे शिवराज सरकार लपवत आहे, असा गंभीर आरोप विरोधकांकडून केला जात आहे. तसेच जबलपूर येथील चौहानी स्मशानभूमीवर बुधवारी तब्बल 41 मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, शहरात केवळ पाचच मृत्यू झाल्याचा दावा राज्य सरकारकडून करण्यात आला.

मृतांच्या संख्येत तफावत
यापूर्वी भोपाळ येथील स्मशानभूमीत अग्नी दिलेल्या मृतदेहांची संख्या कोरोनाने मृत्यू झालेल्या सरकारी आकड्यांपेक्षा जास्त आहे. गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी स्मशानभूमीत एकूण 187 मृतदेहांवर कोविड प्रोटोकॉलनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले होते. मात्र, सरकारी आकड्यात या चार दिवसांत कोरोनामुळे फक्त 5 जणांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली होती. त्यानंतर आता मंत्री प्रेमसिंह पटेल prem singh patel यांनी हे वक्तव्य केले आहे.

Also Read :

Rohit Pawar : ‘राज्यातील निर्बंधांचा अनेकांना त्रास होऊ शकतो, पण…’

स्मृती इराणींचा ममता बॅनर्जीवर हल्लाबोल, म्हणाल्या – ‘कोरोनासाठी मोदी-शहांना जबाबदार धरणे यातून ममतांचे संस्कार दिसतात’


Coronavirus in India : ‘कोरोना’ने सर्वच रेकॉर्ड मोडले ! गेल्या 24 तासांत 2 लाखांहून अधिक रुग्ण, सलग दुसऱ्या दिवशी 1 हजाराहून जास्त रुग्णांचा मृत्यू

अजित पवारांचा फडणवीसांना सणसणीत टोला, म्हणाले -‘आपला नाद कुणी करायचा नाही, सरकार पाडणं हे कोणा येरा गबाळ्याचं काम नाही’

100 कोटींचे खंडणी प्रकरण : CBI कडून माजी ग्रहमंत्री अनिल देशमुखांची साडेआठ तास चौकशी

चंद्राकांत पाटलांचा दावा, म्हणाले- ‘पुढील महिन्यात ‘या’ तारखेला राज्यातील सत्तेला नक्कीच सुरुंग’

Related Posts